हिंगोलीत सकाळच्या सत्रात मतदान केंद्रात गर्दी; ११ वाजेपर्यंत १८.१९ टक्के मतदान

By रमेश वाबळे | Published: April 26, 2024 12:01 PM2024-04-26T12:01:00+5:302024-04-26T12:02:49+5:30

वसमत शहरातील मतदान केंद्र २३८ वर ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे जवळपास अर्धातास मतदान प्रक्रिया थांबली होती.

Congestion at polling station during morning session in Hingoli; 18.19 percent polling till 11 am | हिंगोलीत सकाळच्या सत्रात मतदान केंद्रात गर्दी; ११ वाजेपर्यंत १८.१९ टक्के मतदान

हिंगोलीत सकाळच्या सत्रात मतदान केंद्रात गर्दी; ११ वाजेपर्यंत १८.१९ टक्के मतदान

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी आज, २६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेपासून सुरु झाले असून, सकाळी ९ वाजेपर्यंत ७.२३ टक्के तर ११ वाजेपर्यंत १८.१९ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात हिंगोली, वसमत, कळमनुरी, उमरखेड, किनवट, हदगाव असे ६ विधानसभा मतदारसंघ असून आज सकाळपासून २ हजार ८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. या निवडणुकीत एकूण १८ लाख १७ हजार मतदार आपला हक्क बजावणार असून, ३३ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी ९ वाजेपर्यंत लोकसभा मतदार संघात ७.२३ टक्के मतदान झाले होते. तर ११ वाजेपर्यंत हिंगोली विधानसभा मतदार संघ २१.७३ टक्के, वसमत २०.९२ टक्के, कळमनुरी १५.०१ टक्के, उमरखेड १३.८५ टक्के, किनवट १९.२१ टक्के आणि हदगाव विधानसभा मतदारसंघात १८.३२ टक्के असे एकूण लोकसभा मतदार संघात १८.१९ टक्के मतदान झाले.

दरम्यान, सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाल्यानंतर वसमत शहरातील मतदान केंद्र २३८ वर ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे जवळपास अर्धातास मतदान प्रक्रिया थांबली होती. त्यानंतर ही प्रक्रिया सुरळीत झाली.

Web Title: Congestion at polling station during morning session in Hingoli; 18.19 percent polling till 11 am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.