दुचाकीवरील दोघांना तिघांनी लुटले, सावरी पेट्रोलपंपजवळ घटना
By नरेश रहिले | Updated: June 5, 2023 20:55 IST2023-06-05T20:54:49+5:302023-06-05T20:55:31+5:30
गोंदिया : कॅटरिंगचे काम करून बालाघाटवरून गोंदियाला परतणाऱ्या दुचाकीवरील दोघांना गोंदियातीलच तिघांनी सावरी येथील पेट्रोलपंपजवळ चाकूच्या धाकावर लुटल्याची घटना ...

दुचाकीवरील दोघांना तिघांनी लुटले, सावरी पेट्रोलपंपजवळ घटना
गोंदिया : कॅटरिंगचे काम करून बालाघाटवरून गोंदियाला परतणाऱ्या दुचाकीवरील दोघांना गोंदियातीलच तिघांनी सावरी येथील पेट्रोलपंपजवळ चाकूच्या धाकावर लुटल्याची घटना ४ जूनच्या पहाटे ३ वाजता घडली.
गोंदिया सावराटोली येथील सुभाष वाॅर्ड येथील युसुफ खान पठाण रा. कुंभारेनगर व विक्की नरेश दुसेजा (२०) हे दोघेही बालाघाट येथून कॅटरिंगचे काम करून ते गोंदियाला परतत असताना ४ जूनच्या पहाटे तीन वाजताच्या सुमारास तीन तरुणांनी सावरी पेट्रोलपंपजवळ त्यांच्या मोटरसायकलचा पाठलाग करून आंभोरा गावाच्या रस्त्यावर बाइकचा हँडल ओढून खाली पाडले. यात विक्की नरेश दुसेजा हे जखमी झाले. युसुफ खान पठाण यांच्या गालावर थापड बुक्क्यांनी मारहाण करून चाकूच्या धाकावर त्यांच्या खिशातून १ हजार ३५० रुपये हिसकावून नेले.
या घटने संदर्भात अज्ञात आरोपींवर रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास केल्यावर आरोपी गोलू अशोक चौधरी (१८) रा. श्रीनगर, मालवीय वाॅर्ड गोंदिया, उदय ऊर्फ आऊ उमेश उपाध्याय (१८) रा. मुर्री गोंदिया व अभिषेक प्रेमलाल वर्मा (१९) रा. माताटोली राजेंद्र वॉर्ड श्रीनगर, गोंदिया या तिघांना अटक करण्यात आली. आरोपींवर भादंविच्या कलम ३९४, ३४१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक अभिजित भुजबळ करीत आहेत.