गोंदियात भरदुपारी वाघाचे दर्शन! साकरीटोला-अंजोरा मार्गावर खळबळ
By अंकुश गुंडावार | Updated: June 20, 2025 14:51 IST2025-06-20T14:45:55+5:302025-06-20T14:51:56+5:30
Gondia : गोंदियात वाघाची दहशत! वन विभागाच्या पथकाकडून जेरबंद करण्याचे प्रयत्न

Tiger sighted in Gondia at noon! Villagers in danger on Sakritola-Anjora road
गोंदिया : सालेकसा तालुक्यातील साकरीटाेला-अंजोरा मार्गावर शुक्रवारी (दि.२०) दुपारी १ वाजताच्या सुमारास एक पट्टेदार वाघ आढळला. पाच ते दहा मिनिटे या मार्गावर या वाघाचा मुक्त वावर होता त्यामुळे या मार्गावरुन ये-जा नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
निर्माण झाले होते. यानंतर या वाघाने रस्त्यालगत असलेल्या कालव्याकडे धाव घेतली. गावकऱ्यांची लगेच याची माहिती वन विभागाच्या
अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून वाघाला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील साकरीटाेला-अंजोरा मार्गावर शुक्रवारी दुपारी १ वाजता एक पट्टेदार वाघांचे दर्शन झाले. भर दुपारी वाघाचा रस्त्याचा मुक्त वावर पाहुन गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. या वाघाने रामपुरी-पानगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतातच ठाण मांडले आहे.#tiger#tigervideo#maharashtra… pic.twitter.com/hfCxZo6R0W
— Lokmat (@lokmat) June 20, 2025
सालेकसा तालुक्यातील साकरीटाेला-अंजोरा परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पट्टेदार वाघाचा वावर असल्याची माहिती आहे. या वाघाने तीन ते चार जनावरांची शिकार सुध्दा केली. यामुळे या परिसरातील पशुपालक आणि गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण होते.
शुक्रवारी (दि.२०) दुपारी १ वाजताच्या सुमारास साकरीटोला-अंजोरा मार्गावर हा पट्टेदार वाघ रस्ता पार करीत असताना गावकऱ्यांना
आढळला. भर दुपारी वाघाचा रस्त्याचा मुक्त वावर पाहुन गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. गावकऱ्यांनी लगेच याची माहिती आमगाव
वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पाेहचले आहे. दरम्यान या वाघाने रामपुरी-पानगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतात ठाण मांडले असून त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने उपाययोजना सुरु केल्या आहे.