जिल्ह्यात यंदा ७९ हजार महिला होतील लखपती दीदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 17:13 IST2025-04-10T17:12:43+5:302025-04-10T17:13:58+5:30

महिलांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न : महिलांनो, तुम्ही अर्ज केला का?

This year, 79 thousand women will become Lakhpati Didi in the district. | जिल्ह्यात यंदा ७९ हजार महिला होतील लखपती दीदी

This year, 79 thousand women will become Lakhpati Didi in the district.

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात 'लखपती दीदी योजना' जाहीर केली होती. या लाभार्थ्यांचे उद्दिष्ट जिल्ह्यात आता ४७ हजारांवरून ७९ हजार करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४७ हजार महिलांना 'लखपती दीदी' होण्यासाठी प्रशिक्षण दिले गेले आहे. यंदा ७९ हजार लखपती दीदी होणार आहेत.


लखपती दीदी योजना?
स्वयंसहाय्यता गटांशी संबंधित महिलांना स्वयंरोजगाराशी जोडणे व आर्थिकदृष्ट्या मजबुतीसाठी पात्र महिलांना कर्ज दिले जाते.


कोणाला मिळतो लाभ ?
हा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा नाही. सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी महिलांना त्यांच्या राज्यातील बचत गटात सामील व्हावे लागेल.


उद्दिष्ट ७९ हजाराचे
महिलांच्या आर्थिक उत्थानासाठी लखपती दीदी योजना सुरू केली. यातून महिलांना एक टक्के व्याजावर कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी निधी बँकेमार्फत दिला जातो. यंदा ७९ हजार महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट आहे.


उद्दिष्ट २ वरून ३ कोटींवर
या योजनेंतर्गत देशभरातील खेड्यांतील दोन कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. आता या योजनेच्या लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ४७ हजारांवरून ७९ हजार करण्यात आले आहे. ७९ हजार महिला यंदा लखपती दीदी होणार आहेत.


कागदपत्रे काय हवी?
आधारकार्ड, पॅनकार्ड, पत्त्याचा पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र, मोबाइल नंबर, बँक खाते तपशील, पासपोर्ट आकाराचा फोटो आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.


"सरकारने महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी ग्रामसंघाच्या माध्यमातून समुदाय गुंतवणूक निधी उपलब्ध करून दिला. त्या निधीच्या माध्यमातून आम्ही आपली उपजीविका चालविण्यासाठी सक्षम होत आहोत."
- भारती चौधरी, लखपती दीदी, टेमणी


"लखपती दीदी ही योजना बचत गटातील महिलांसाठी 'उमेद' मार्फत राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे आर्थिक विकास साध्य करता येणार आहे. महिला सक्षमीकरणाची ही वाटचाल आहे."
- नरेंद्र रहांगडाले, जिल्हा अभियान व्यवस्थापक, उमेद


"समुदाय गुंतवणूक निधीतून मिळालेल्या मदतीच्या आधारावर आम्ही महिला आपल्या पायावर उभ्या राहू शकलो. सर्व महिला आत्मनिर्भर होण्यासाठी लखपती दीदीचा लाभ घेऊन आपली आर्थिक उन्नती साधत आहेत."
- पंचशीला नांदणे, लखपती दीदी, टेमणी

Web Title: This year, 79 thousand women will become Lakhpati Didi in the district.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.