जात प्रमाणपत्रासाठी १२८ अन् रहिवासीसाठी मोजा ६९ रुपये, शुल्क वाढीने बसतोय भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 16:39 IST2025-05-12T16:38:11+5:302025-05-12T16:39:06+5:30

'आपले सरकार'ने सेवा दर दुपटीने वाढविले : प्रमाण काढताना बसतोय फटका

Rs 128 for caste certificate and Rs 69 for resident certificate, Bhurdand is facing a hike in fees | जात प्रमाणपत्रासाठी १२८ अन् रहिवासीसाठी मोजा ६९ रुपये, शुल्क वाढीने बसतोय भुर्दंड

Rs 128 for caste certificate and Rs 69 for resident certificate, Bhurdand is facing a hike in fees

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
'आपले सरकार' सेवा केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांचे चलन शुल्क दुपटीने वाढविण्यात आले आहे. नॉन क्रीमिलेअर, जात प्रमाणपत्रासाठी १२८, तर रहिवाशांसह इतरांसाठी ६९ रुपये मोजावे लागणार आहेत. हे दर दुपटीने वाढले आहेत. शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर साडेसहा वर्षांनंतर ही वाढ झाल्याने सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसणार असल्याचे चित्र गोंदिया जिल्ह्यात बघायला मिळत आहे.


जिल्ह्यातील गावोगावी आपले सरकार सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे. या केंद्रांच्या माध्यमातून प्रमाणपत्र, जात उत्पन्न, राष्ट्रीयत्व, नॉन क्रीमिलेअर, रहिवासी आदी प्रकारची दाखले वितरित केली जातात. त्यातच ५ मे रोजी बारावीचा निकाल लागला आहे, तर दहावीचा निकाल पुढील आठवड्यात लागणार आहे. त्यानंतर महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होणार आहे.


या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना वरील प्रमाणपत्रांची गरज असते. शिवाय विविध प्रकारची प्रतिज्ञापत्र भरून द्यावी लागतात. या काळात आपले सरकार केंद्र, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रामध्ये पालकांची, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र, आता ऐन प्रवेश प्रक्रियेच्या तोंडावर आपले सरकार सेवा केंद्रातील प्रमाणपत्रांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. 


नवीन दराची आकारणी २५ एप्रिलपासून सुरू

  • या आधी २००८ मध्ये एका प्रमाणपत्रासाठी २० रुपये लागत होते. वाढती महागाई, जागेचे भाडे, विजेचे बिल, संगणक व प्रिंटरची देखभाल दुरुस्ती यामुळे दरात २०१८ मध्ये वाढ केली होती.
  • आता शासनाने पुन्हा हे दर दुपटीने वाढविले आहेत. त्यामुळे सामान्यांना मोठा फटका बसला आहे.
  • शहर आणि जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये वाढीव दराची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
  • जिल्ह्यात २५ एप्रिलपासूनच नव्या दराने शुल्क आकारणी सुरू झाली आहे.


असे आहेत प्रमाणपत्रांचे जुने - नवीन दर
प्रमाणपत्रे                   जुने दर          नवीन दर

जात प्रमाणपत्र              ५७.२०              १२८
नॉन क्रीमिलेअर            ५७.२०              १२८         
उत्पन्न                         ३३.६०                ६९
रहिवासी                      ३३.६०               ६९
नॅशनॅलिटी                   ३३.६०                ६९        
एसईसी                       ३३.६०                ६९

Web Title: Rs 128 for caste certificate and Rs 69 for resident certificate, Bhurdand is facing a hike in fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.