भरधाव कारने रस्त्याच्या कडेला बसलेल्या लोकांना उडविले
By नरेश रहिले | Updated: September 2, 2024 14:17 IST2024-09-02T14:16:50+5:302024-09-02T14:17:17+5:30
Gondia : फुलचूर येथे ‘हिट अँड रन’चा थरार : घटना झाली सीसीटीव्हीमध्ये कैद

People sitting on the side of the road were blown away by the speeding car
नरेश रहिले
गोंदिया : लगतच्या ग्राम फुलचर येथे ‘हिट अँड रन’चा थरार घडला असून, पॉलिटेक्निक कॉलेजसमोर रस्त्याच्या कडेला बसलेल्या दोन ट्रक ड्रायव्हर व एका सायकलस्वाराला भरधाव वेगात असलेल्या कारने धडक दिली. या घटनेत दोन ट्रक ड्रायव्हर व सायकलस्वार गंभीर जखमी झाले आहे. ही घटना सोमवारी (दि. २) सकाळी ९:३० वाजताच्या दरम्यान घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, लगतच्या ग्राम फुलचूर येथील पॉलिटेक्निक कॉलेजसमोर एमएच ३५ एव्ही ४८७३ क्रमांकाच्या दुचाकीवर एक, तर रस्त्यावर खाली बसून तीन ट्रकचालक गप्पा मारत होते. याप्रसंगी त्यांच्या शेजारून एक सायकलस्वार जात असताना अचानकच कार क्रमांक एमएच ३५ एजी १५८८ त्यांच्या अंगावर आली. यामध्ये खोमेश उरकुडे (२४, रा. कोसेटोला, गोरेगाव), हेमराज राऊत (५४, रा. कारंजा), कादीर शेख (३८, रा. फुलचूर) तसेच सायकलस्वार गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.