सडक अर्जुनी तालुक्यात एक मिनिटात लावली एक हजार रोपटी

By अंकुश गुंडावार | Updated: June 27, 2025 16:31 IST2025-06-27T16:30:27+5:302025-06-27T16:31:40+5:30

सप्रेम फाउंडेशन मुंबईचा उपक्रम : ग्रामपंचायतच्या शिरपेचात मानाचा तुरा

One thousand saplings planted in one minute in Sadak Arjuni taluka | सडक अर्जुनी तालुक्यात एक मिनिटात लावली एक हजार रोपटी

One thousand saplings planted in one minute in Sadak Arjuni taluka

सडक अर्जुनी : तालुक्यातील डव्वा येथील राष्ट्रीय पंचायतराज पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतने पर्यावरण संवर्धनासाठी सप्रेम फाऊंडेशन च्या सहकार्याने वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला. या उपक्रमातंर्गत शुक्रवारी (दि.२७) डव्वा येथे एका मिनिटात १ हजार रोपटे लावण्याचा विक्रम करण्यात आला.

सरपंच योगेश्वरी चौधरी यांच्या पुढाकाराने व सप्रेम फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा उपक्रम शुक्रवारी राबविण्यात आला. यावेळी एक हजार केसर आंबा, इतर झाडांच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली. यावेळी जि.प.सदस्य भुनेश्वर पटले,पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, सडक योजनेचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे, गटविकास अधिकारी नरेगा डी.एस.लोहबरे, वनक्षेत्र अधिकारी उमेश गोटेफोडे, जिल्हा सहाय्य कार्यक्रम अधिकारी सुरेखा ब्राह्मणकर, तालुका सहाय्यक कार्यक्रम अधिकारी हरेश कटरे, जागेश्वर लंजे, गटशिक्षणाधिकारी चव्हाण, वनरक्षक दामिनी लांजेवार, राखी काठेवार, अक्षय नंदेश्वर, शालू मेंडे, प्रियंका नागपुरे, वनिता ब्राह्मणकर, प्रिती कोहळे, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. डव्वा ग्रामपंचायतच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी गावात विविध नाविन्यपुर्ण उपक्रम राबविले जात आहे. याच उपक्रमाचा एक भाग व गावकऱ्यांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करण्यासाठी एका मिनिटात एक हजार रोपटी लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

गावात प्लास्टिक बंदी
पृथ्वीवरील वाढत्या प्रदूषणामुळे तापमाणात वाढ होत आहे.याचा परिणाम मानवी शरीर आणि वनस्पती पिकांवर होत आहे. हे थांबवायचे असेल तर आधी ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज आहे. हीच बाब लक्षात घरोघरी सौर ऊर्जेचा वापर करणे, प्लास्टिक बंदी, फटाके बंदी अश्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत.
 

Web Title: One thousand saplings planted in one minute in Sadak Arjuni taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.