Maharashtra Election 2019 ; दिव्यांग मतदार रॅलीचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST2019-10-13T06:00:00+5:302019-10-13T06:00:17+5:30
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठीच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत दिव्यांग मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा, यासाठी अर्जुनी मोरगाव पंचायत समिती गटसाधन केंद्राच्या वतीने ११ ऑक्टोबरला जिल्हा परिषद हायस्कुल येथून सकाळी ११ वाजता दिव्यांग मतदार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली.

Maharashtra Election 2019 ; दिव्यांग मतदार रॅलीचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठीच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत दिव्यांग मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा, यासाठी अर्जुनी मोरगाव पंचायत समिती गटसाधन केंद्राच्या वतीने ११ ऑक्टोबरला जिल्हा परिषद हायस्कुल येथून सकाळी ११ वाजता दिव्यांग मतदार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली.
या वेळी तहसीलदार विनोद मेश्राम, नायब तहसीलदार भानारकर, गटशिक्षणाधिकारी एन.जे.सिरसाटे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ए.एस.बरईकर, विस्तार अधिकारी अनुपकुमार भावे (पंचायत), प्राचार्य दिवटे, सहायक पोलीस निरीक्षक देवीदास शेवाळे, सरस्वती विद्यालयाचे पठाण, बहुउद्देशिय हायस्कुलच्या ब्राम्हणकर उपस्थित होत्या. दिव्यांग मतदारांचा मतदानात सहभाग वाढावा तसेच जिल्ह्यातील सर्व सामान्य मतदारांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा या उद्देशाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी सोनाले यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील हायस्कुल, कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य यांची सभा घेऊन तालुक्यातील प्रत्येक गावात जनजागृती करण्यात आली. चित्रकला, निबंध, रांगोळी, वादविवाद, पथनाट्य स्पर्धा घेण्यात आल्या. संकल्प पत्र, सायकल रॅली, मानवी साखळी, प्रथम मतदान करणाऱ्या नवदाम्पत्यांचे स्वागत इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. दिव्यांग मतदार रॅलीमध्ये तालुक्यातील १५० दिव्यांग विद्यार्थी, १५ प्रौढ मतदार, ५ ट्रॉयसीकल व २१०० विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
गटसाधन केंद्रातील अपंग समावेशित शिक्षण तज्ज्ञ चेतना मेश्राम,वाय.डी. कापगते, नेरकर, गजभिये, नंदेश्वर, सयाम, मानकर, विषय साधन व्यक्ती सत्वान शहारे, आर.डी. पातोडे, व्ही.जी.मेश्राम, उर्मिला पडोळे, त्रिवेणी रामटेके यांनी सहकार्य केले.