Maharashtra Election 2019 : मतदान प्रक्रियेच्या ‘संथ’ कार्यप्रणालीने मतदारात नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:00 IST2019-10-22T05:00:00+5:302019-10-22T05:00:31+5:30
चान्ना (बाक्टी) येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत मतदारांसाठी दोन मतदान केंद्र सुरु करण्यात आली होते. सकाळी ७ वाजतापासून मतदान केंद्र क्रमांक १८८ वर मतदारांची गर्दी होती. दुपारी २.३० वाजतापर्यंत सदर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरु असल्याने रांगेत असणाऱ्या मतदारांमध्ये कमालीचा संताप निर्माण झाला होता. दोन तीन तासांपासून रांगेत उभ्या असलेल्या मतदारांनी यावरुन संताप व्यक्त केला.

Maharashtra Election 2019 : मतदान प्रक्रियेच्या ‘संथ’ कार्यप्रणालीने मतदारात नाराजी
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघातील चान्ना (बाक्टी) येथील मतदान क्रमांक १८८ मध्ये मतदान प्रक्रिया अगदी कासव गतीने सुरू होती त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी सूर निर्माण झाला होता.
चान्ना (बाक्टी) येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत मतदारांसाठी दोन मतदान केंद्र सुरु करण्यात आली होते. सकाळी ७ वाजतापासून मतदान केंद्र क्रमांक १८८ वर मतदारांची गर्दी होती. दुपारी २.३० वाजतापर्यंत सदर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरु असल्याने रांगेत असणाऱ्या मतदारांमध्ये कमालीचा संताप निर्माण झाला होता. दोन तीन तासांपासून रांगेत उभ्या असलेल्या मतदारांनी यावरुन संताप व्यक्त केला. केंद्रावरील मतदान कर्मचाऱ्यांच्या कासवगतीने कार्यप्रणालीनेच मतदान प्रक्रियेस विलंब होत असल्याचा आरोप मतदारांनी केला. यामुळे मतदान केंद्राच्या बाहेर काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी मतदारांशी चर्चा करुन त्यांची समजूत काढली. त्यानंतर मतदार शांत झाले.
मात्र हा प्रकार लक्षात घेत अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान केंद्रावरील अधिकाºयांनी या प्रकाराची माहिती वरिष्ठांना दिली.