Maharashtra Election 2019 : भाऊ, काय म्हणते निवडणुकीची हवा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST2019-10-15T05:00:00+5:302019-10-15T05:00:05+5:30

एकदा की प्रचाराचे वारे वाहू लागले की, मग लग्नकार्य असो, अन्यथा गावचा आठवडी बाजार असो, चार-आठ जण जमले की निवडणुकीचा विषय ओघाने छेडलाच जातो. मिळेल तेथे सावलीचा आधार घेत ग्र्नामस्थ गप्पात रंगलेले दिसत आहेत. काय म्हणते निवडणुकीची हवा, असा सवाल येताच दुष्काळाने आमचीच हवा निघायची वेळ आली अन् काय निवडणुकीचे घेवून बसलात, असे प्रतिसवालही ऐकायला मिळाला. आपल्या जवळच्या माणसाचाच विचार करावा लागेल.

Maharashtra Election 2019 : Brother, what does the election say? | Maharashtra Election 2019 : भाऊ, काय म्हणते निवडणुकीची हवा?

Maharashtra Election 2019 : भाऊ, काय म्हणते निवडणुकीची हवा?

ठळक मुद्देसर्वत्र चर्चा : गावागावातून घेतला जातोय कानोसा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता जोर आला आहे. दरम्यान, अवघ्या आठ दिवसांवर आलेल्या या निवडणुकीची रंगत आता खेड्यापाड्यातही जोर धरत आहे. आता गावागावातून तुमच्याकडे हवा धरत आहे. आता गावागावातून तुमच्याकडे हवा तरी कुणाची आहे, याचा कानोसा घेतला जात आहे. निवडणुक मग ती कोणती का असेना, ग्रामीण जनतेसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. एकदा की प्रचाराचे वारे वाहू लागले की, मग लग्नकार्य असो, अन्यथा गावचा आठवडी बाजार असो, चार-आठ जण जमले की निवडणुकीचा विषय ओघाने छेडलाच जातो. मिळेल तेथे सावलीचा आधार घेत ग्र्नामस्थ गप्पात रंगलेले दिसत आहेत. काय म्हणते निवडणुकीची हवा, असा सवाल येताच दुष्काळाने आमचीच हवा निघायची वेळ आली अन् काय निवडणुकीचे घेवून बसलात, असे प्रतिसवालही ऐकायला मिळाला. आपल्या जवळच्या माणसाचाच विचार करावा लागेल. आमच्या गावात तर एकतर्फी मतदान होणार आहे. कुणीही निवडून आलं तरी आपले दिवस थोडीच पालटणार, शेतकऱ्यांचं हित पाहणाºयालाच प्राधान्य देऊ, अशा अनेक गप्पा निवडणुकीचा रंग भरु लागल्या आहेत. सध्याचा काळ हा सोशल मिडियाचा काळ असल्याने एकमेकांच्या गावात नेमके काय सुरु आहे, हे चटकन कळत आहे. असे असले तरी राजकीय पातळीवर कुणाची हवा आहे, हे स्पष्टपणे सांगताना अनेक जण खबरदारी घेत आहेत. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांमध्ये फेसबुक आणि मोबाईलवर तर युद्धच सुरु आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 : Brother, what does the election say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.