Maharashtra Election 2019 ; चार मतदारसंघातून ७१ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST2019-10-06T06:00:00+5:302019-10-06T06:00:11+5:30
शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस होता. त्यानंतर शनिवारी उमेदवारांच्या अर्जांची छाननी करण्यात आली. यात जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील एकूण पाच उमेदवारांचे नामाकंन रद्द झाले. यात गोंदिया विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे मुकेश शिवहरे यांनी एबीफार्म न जोडल्यामुळे तर पंकज यादव यांनी हमीपत्र न जोडल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला.

Maharashtra Election 2019 ; चार मतदारसंघातून ७१ उमेदवार रिंगणात
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्जांची शनिवारी (दि.५) छाननी करण्यात आली.यात जिल्ह्यातील चारही मतदारसंघातून एकूण पाच अर्ज त्रृटींमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द केले. त्यामुळे आता रिंगणात ७१ उमेदवार असून सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी किती उमेदवार माघार घेतात.यानंतरच चारही मतदारसंघातील अंतीम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस होता. त्यानंतर शनिवारी उमेदवारांच्या अर्जांची छाननी करण्यात आली. यात जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील एकूण पाच उमेदवारांचे नामाकंन रद्द झाले. यात गोंदिया विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे मुकेश शिवहरे यांनी एबीफार्म न जोडल्यामुळे तर पंकज यादव यांनी हमीपत्र न जोडल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून भाजपचे व्यकंट रेवचंद खोब्रागडे यांनी पक्षाचा एबीफार्म न जोडल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. तिरोडा मतदारसंघातून कैलाश गजभिये यांच्या अर्जावर सूचकाने स्वाक्षरी केली नसल्यामुळे तर काँग्रेसचे राधेलाल पटले यांनी पक्षाचा एबीफार्म न जोडल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द केला. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ७६ उमेदवारांनी १२२ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र आता यातील ५ उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने आता चारही मतदारसंघातून ७१ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून सर्वच पक्षातील बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची मनधरणी केली जात असून यापैकी किती उमेदवार माघार घेतात त्यानंतरच या चारही मतदारसंघातील अंतीम लढतीचे चित्र स्पष्ट होईल. विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी बघितल्यास, अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघात २०, तिरोडा १६, गोंदिया २५ आणि आमगाव विधानसभा मतदारसंघातून १० उमेदवार रिंगणात आहेत.
आता लक्ष त्यांच्याकडे
शनिवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर त्यात पाचही मतदारसंघातून ५ अर्ज रद्द झाले. त्यानंतर सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरांचे मन वळविण्यात पक्षांच्या नेत्यांना कितपत यश येत आणि किती उमेदवार माघार घेतात याकडे लक्ष लागले आहे.
मंगळवारपासून मतदार बंधूनो
सोमवारी उमेदवारी अर्ज मागे आणि त्यानंतर चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. मात्र सोमवारीच चारही मतदारसंघातील अंतीम लढतीचे चित्र स्पष्ट होणार असल्याने अधिकृत पक्षाचे उमेदवार मंगळवारपासून प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारपासून मतदार बंधूनो हे शब्द ऐकायला मिळणार आहे.
प्रचारासाठी मिळणार १३ दिवस
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार २१ आॅक्टोबरला मतदान होणार आहे. तर ७ आॅक्टोबरनंतर उमेदवारीची सर्व प्रक्रिया संपणार आहे. तर मतदानापूर्वी दोन दिवस आधीच उमेदवारांना जाहीर प्रचार बंद करावा लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांना १३ दिवसांचा कालावधी मिळणार असून याच कालावधीत त्यांना मतदारांपर्यंत पोहचण्याचे नियोजन करावे लागणार आहे.
मोठ्या नेत्यांच्या संभाकडे लक्ष
मागील निवडणुकीत गोंदिया विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंदिया येथे सभा घेतली होती. तर या वेळी या चारही मतदारसंघात कोणत्या मोठ्या नेत्यांचा सभा होतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.