Lok Sabha Election 2019; हावडा-अदी एक्स्प्रेसचे गोंदिया स्थानकावर स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 22:28 IST2019-04-10T22:27:17+5:302019-04-10T22:28:16+5:30
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ मध्ये देशात विविध टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे. यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृती करण्यासाठी हावडा येथून ८ एप्रिलला प्रारंभ झालेल्या हावडा-अदी एक्स्प्रेसचे मंगळवारी (दि.९) सायंकाळी ५ वाजता गोंदिया रेल्वे स्थानकावर आगमन झाले.

Lok Sabha Election 2019; हावडा-अदी एक्स्प्रेसचे गोंदिया स्थानकावर स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ मध्ये देशात विविध टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे. यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृती करण्यासाठी हावडा येथून ८ एप्रिलला प्रारंभ झालेल्या हावडा-अदी एक्स्प्रेसचे मंगळवारी (दि.९) सायंकाळी ५ वाजता गोंदिया रेल्वे स्थानकावर आगमन झाले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी रेल्वेतील प्रवाशांसोबत संवाद साधून त्यांना गो फॉर वोट हे पॉम्पलेटस दिले.
सर्वांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असा आग्रह त्यांनी या वेळी केले. या वेळी रेल्वेतील काही प्रवाशांनी वोटर्स सेल्फी पॉर्इंट समोर उभे राहून सेल्फी सुध्दा काढली. जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी हावडा-अदी एक्सप्रेसचे लोको पायलट एच.डी.मोटघरे यांचे पुष्पगुच्छ व मिठाई देऊन स्वागत केले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी या रेल्वेला औपचारीकरित्या हिरवी झेंडी दाखवून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, रेल्वेचे स्टेशन मास्तर एन.आर.पती यांचेसह प्रशासनातील अनेक अधिकारी, कर्मचारी, रेल्वे व रेल्वे पोलीस आणि अधिकारी, नागरिक, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.