Lok Sabha Election 2019; परप्रांतातील ३०० वाहने सभेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:09 IST2019-04-03T23:40:20+5:302019-04-04T13:09:44+5:30
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गोंदियात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थिती दर्शविण्यासाठी छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यातील ३०० वाहने दाखल झाली आहेत. छत्तीसगड येथील वाहने आमगाव मार्गाने होत पतंगा मैदानावरुन बायपास रस्त्याने सभा स्थळी गेली.

Lok Sabha Election 2019; परप्रांतातील ३०० वाहने सभेला
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गोंदियात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थिती दर्शविण्यासाठी छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यातील ३०० वाहने दाखल झाली आहेत. छत्तीसगड येथील वाहने आमगाव मार्गाने होत पतंगा मैदानावरुन बायपास रस्त्याने सभा स्थळी गेली. सभा स्थळापासून सुमारे १ किलोमीटर अंतरावरच त्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.
मध्यप्रदेश राज्यातून आलेल्या वाहनांना बालाघाट रस्त्यावर ठिकठिकाणी उभे करण्यात आले होते. मोदींच्या प्रचार सभेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी-कार्यकर्ते व नागरिक वाहनांनी आले होते. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना मोदींच्या प्रचार सभेसाठी वाहनांनी आणण्यात आले होते.
या सभेसाठी सुमारे २ ते ३ हजार चारचाकी वाहनांची गर्दी गोंदियात झाली होती. प्रचार सभेसाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था योग्य पद्धतीने न करण्यात आल्यामुळे पतंगा मैदानापासून तर बालाघाट रस्त्यापर्यंत विविध ठिकाणी चारचाकी व दुचाकी वाहनांची पार्किंग अस्ताव्यस्त होती.
रस्त्यांवर गर्दी होऊ नये याकरिता शहरातील वाहनांसाठी जिल्हा क्रीडा संकुल व मरारटोली येथील सामाजिक न्याय भवनाच्या बाजूला असलेल्या पटांगणात पार्कींगची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु क्रिडा संकुलात बोटावर मोजण्या इतकीच वाहने असताना बायपास रस्त्याच्या कडेलाच जागा मिळेल तेथे वाहने ठेवण्यात आली होती.