घरकुल मिळाले नसल्यास ॲपवर स्वतःच करा अर्ज आणि मिळवा आपल्या हक्काचे घरकुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 17:30 IST2025-03-20T17:29:15+5:302025-03-20T17:30:32+5:30

गरजवंतांना मिळेल हक्काचा निवारा : स्वतःच सर्वेक्षण करा अन् द्या घोषणापत्र

If you haven't received a home, apply on the app yourself and get the home you deserve. | घरकुल मिळाले नसल्यास ॲपवर स्वतःच करा अर्ज आणि मिळवा आपल्या हक्काचे घरकुल

If you haven't received a home, apply on the app yourself and get the home you deserve.

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
आम्हाला गरज असताना घरकूल दिले नाही, श्रीमंतांची नावे घरकुलाच्या यादीत आहेत, सरपंच, सचिवाने नाव यादीतून वगळले, अशी ओरड नेहमीच असते. यावरून अनेकदा वादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होतात. पण, आता ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. तर, घरकुलासाठी होणारी ओरड कायमची बंद होणार आहे. केंद्र सरकारने ज्यांना घरकूल मिळाले नाही, त्यांच्यासाठी 'आवास प्लस २०२४' हे अॅप जारी करून या अॅपवर घरकुलासाठी अर्ज करा अन् हक्काचे घरकूल मिळवा, असे जि. प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले आहे.


केंद्रीय मंत्रिमंडळाने २ कोटी घरे बांधण्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी सन २०२४-२५ ते २०२८-२९ या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ सुरू करण्याची घोषणा केली आहे. सन २०१८ मध्ये झालेल्या घरकुलाच्या सर्वेक्षणासंदर्भात मोठी ओरड होती. प्रतीक्षा यादीत समाविष्ट न झालेले किंवा सिस्टीमद्वारे अपात्र झालेल्या लोकांनाही घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. ज्यांनी घरकुलाचा लाभ यापूर्वी घेतला नाही आणि कच्या घरात ज्यांचे राहणे आहे, अशा लोकांना घरकुलाचा लाभ दिला जाणार आहे. आता घरकूल आम्हाला मिळाले नाही, अशी ओरड कायमची थांबणार आहे.


१ एप्रिल पासून होणार सुरुवात
आपल्याला घरकूल हवा असेल, तर 'आवास प्लस २०२४' या अॅपवर जाऊन १ एप्रिल २९२५ पासून अर्ज करू शकता. त्या अर्जाची चाचणी होईल. हे अर्ज ग्रामीण भागातील नागरिकच करू शकतात. या योजनेचा लाभअधिक लोकांनी घ्यावे, असे आवाहन ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर यांनी केले आहे.


ग्राम पंचायत अधिकारी राहणार सर्वेअर
आपल्या गावातील ग्राम पंचायत अधिकारी हा या घरकुलांचा सर्वेअर राहणार आहे. नागरिकांनी 'आवास प्लस २०२४' या अॅपवर स्वतः अर्ज करावे किंवा आपल्या गावातील ग्राम पंचायत अधिकारी यांच्याकडून अर्ज करून घ्यावे. पात्र असलेल्या आणि अचूक माहिती भरणाऱ्या नागरिकाला घरकुलाचा लाभ हमखास मिळणार आहे, असे विस्तार अधिकारी सांख्यिकी वैशाली खोब्रागडे यांनी सांगितले.


"जिल्ह्यातील गरजू नागरिकांना घरकूल देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायती सज्ज झाल्या आहेत. सर्व ग्राम पंचायतींनी ई-केवायसी केली असून, ग्राम पंचायत अधिकारी या घरकुलांचे सर्वेअर म्हणून काम पाहत आहेत. गरजूंनी स्वतः अॅपवर जाऊन अर्ज करावे किंवा ग्राम पंचायत अधिकाऱ्यामार्फत घरकुलासाठी अर्ज करावे."
- एम. मुरूगानंथम, मुकाअ जि. प. गोंदिया.


"सन २०१८ च्या घरकुलाच्या यादीत ज्यांचे नाव घरकुलासाठी आले नाही आणि ज्यांना घरकुलाची गरज आहे. अशा सर्वांना केंद्र शासनाकडून घरकूल देण्यात येणार आहे. यासाठी गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी घरकुलासाठी सेल्फ अर्ज करावे किंवा आपल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे घरकुलासाठी अर्ज करावे."
- लायकराम भेंडारकर, अध्यक्ष जि.प. गोंदिया.

Web Title: If you haven't received a home, apply on the app yourself and get the home you deserve.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.