गोंदिया : अंगावर विज पडून शेतकरी ठार, आमगाव तालुक्यातील कालीमाती येथील घटना
By अंकुश गुंडावार | Updated: May 27, 2025 21:18 IST2025-05-27T21:17:01+5:302025-05-27T21:18:18+5:30
सध्या शेतशिवारात रब्बी हंगामातील धानाची कापणी आणि खरीप हंगाम पुर्व कामे सुरु आहे. मंगळवारी सतिश फुंडे हे शेतात काम करीत असताना सांयकाळी ६ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला.

गोंदिया : अंगावर विज पडून शेतकरी ठार, आमगाव तालुक्यातील कालीमाती येथील घटना
आमगाव (गोंदिया) : शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर विज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.२७) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तालुक्यातील कालीमाती येथे घडली. सतिश रामकृष्ण फुंडे (४८) रा. कालीमाटी असे विज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
सध्या शेतशिवारात रब्बी हंगामातील धानाची कापणी आणि खरीप हंगाम पुर्व कामे सुरु आहे. मंगळवारी सतिश फुंडे हे शेतात काम करीत असताना सांयकाळी ६ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला. याच दरम्यान शेतात काम करीत असलेल्या सतिश फुंडे याच्या अंगावर विज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
बाजुच्या शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या हा प्रकार येताच त्यांनी लगेच तिकडे धाव घेतली. तसेच या घटनेची माहिती फुंडे यांच्या कुटुंबिय व तलाठी आणि पोलिस स्टेशन दिली. सतिश फुंडे यांच्या मृत्यूने फुंडे कुटुंबीयावर मोठे संकट कोसळले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त पराव आहे.