Gondia | नगर परिषदेचा दणका; चाट दुकानाचे अनधिकृत बांधकाम हटवले
By कपिल केकत | Updated: September 13, 2022 18:38 IST2022-09-13T18:37:08+5:302022-09-13T18:38:15+5:30
नेहरू चौक चौपाटी येथील कारवाई

Gondia | नगर परिषदेचा दणका; चाट दुकानाचे अनधिकृत बांधकाम हटवले
गोंदिया : चाट दुकानदारांना दिलेल्या नेहरू चौकातील चौपाटी परिसरातील अनधिकृतरित्य पक्के बांधकाम करणाऱ्या चाट दुकानदाराचे अनधिकृत बांधकाम नगर परिषदेने काढले. मंगळवारी (दि.१३) दुपारी १२.३० वाजता दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
शहरातील चाट दुकानदारांना वेगवेगळे राहण्यापेक्षा एकत्र राहण्यासाठी नेहरू चौक परिसरात जागा देण्यात आली असून त्याला चौपाटी म्हटले जाते. या चौपाटीत असलेल्या बॉम्बे चाट सेंटरच्या मालकाने नगर परिषदेने ठरवून दिलेल्या बांधकामा व्यतिरिक्त आपल्याच मर्जीने दुकानाचे पक्के बांधकाम व फ्लोरिंग करून टाकले. हे बांधकाम अनधिकृत असल्याने नगर परिषदेने मंगळवारी प्लास्टिक बंदीचे धाडसत्र राबवित असतानाच पथकाने या चाट दुकानाचे अनधिकृत बांधकामही काढून टाकले.
या मोहिमेत उपमुख्याधिकारी विशाल बनकर, नगर परिषद अभियंता डॉली मदान, अभियंता अनिल दाते, अभियंता मनीष जुनघरे, स्वच्छता विभागाचे अभियंता सुमेध खापर्डे, आस्थापना विभाग प्रमुख मनीषा पारधी, प्रतीक मानकर, प्रफुल्ल पानतवने यांच्यासह अन्य उपस्थित होते.