घरी सोडून देतो म्हणून दुचाकीवर बसविले अन् बसस्थानकावर नेऊन झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2022 16:12 IST2022-09-15T16:10:07+5:302022-09-15T16:12:11+5:30
देवरी शहरातील घटना

घरी सोडून देतो म्हणून दुचाकीवर बसविले अन् बसस्थानकावर नेऊन झोडपले
गोंदिया : घरी सोडून देतो म्हणत दुचाकीवर बसवून नेत चार जणांनी एकाला बदडून काढले. याप्रकरणी चार जणांविरुद्ध देवरी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ही घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता घडली. देवरी शहरातील वॉर्ड क्रमांक-८ येथील साबीर अब्बास शेख (४२) यांना आरोपीने घरी सोडून देतो म्हणून दुचाकीवर बसविले अन् बसस्थानकावर नेऊन झोडपले. आरोपी ८ दिवस अगोदर मोटारसायकल जोरात चालवित असल्याने साबीरने त्याला हटकले होते. याचा राग धरून आरोपीने साबीर चिचगड रोडने पायी आपल्या घरी जात असलेल्या अब्बास यांना फॉरेस्ट ऑफिसच्या समोर घरी सोडून देतो असे बोलून बाईकवर बसविले. त्यांना बाईकने बसस्थानक येथे नेऊन जात असताना चार आरोपींनी काठीने डोक्यावर मारून शिवीगाळ केली. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गायधने करीत आहेत.