सरासरी ४६ वर्षे वयोगटातील उमेदवार सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 06:00 IST2019-10-12T06:00:00+5:302019-10-12T06:00:19+5:30
आमदार, खासदार व मंत्र्यांचे थाटबाट पाहण्यासारख्या आहे. मान-सन्मान व संपत्ती हे सर्व काही त्यांच्याजवळ असते व सर्वांनाच अशा शाही जीवनाची अपेक्षा असते. यासाठी काही कठीण परीक्षा देण्याची गरज नसून राजकारणाच्या रिंगणात भाग्य आजविणे गरजेचे आहे.यात एखाद्याचे नशिब फळफळले व खुर्ची हात आल्यास लॉटरीच लागते.

सरासरी ४६ वर्षे वयोगटातील उमेदवार सर्वाधिक
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राजकारण्यांचा शाही थाट बघून आता कित्येकांना खुर्चीचा मोह आवारणे कठीण होत असल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे की, कित्येक जण आपली नोकरी सोडून राजकारणात भाग्य आजवित असल्याचे दिसत आहे. ज्येष्ठांना लागलेले राजकारणाचे फॅड तरूणांनाही लागले असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचे वयोगट बघता सर्वाधिक उमेदवार सरासरी ४६ वर्षे वयोगटातील आहेत.
आमदार, खासदार व मंत्र्यांचे थाटबाट पाहण्यासारख्या आहे. मान-सन्मान व संपत्ती हे सर्व काही त्यांच्याजवळ असते व सर्वांनाच अशा शाही जीवनाची अपेक्षा असते. यासाठी काही कठीण परीक्षा देण्याची गरज नसून राजकारणाच्या रिंगणात भाग्य आजविणे गरजेचे आहे.यात एखाद्याचे नशिब फळफळले व खुर्ची हात आल्यास लॉटरीच लागते. हेच कारण आहे की, पूर्वी राजक ारणापासून चार हात दूर राहा असे सांगणारे आता कमी झाले आहेत. यामुळेच आता तरूणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना खुर्चीची माया भुरळ घालत आहे.
जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत रिंगणात असलेल्या उमेदवारांची यादी असेच काही सांगून जात आहे.कारण निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांचे वयोगट बघितल्यास सर्वाधिक उमेदवार सरासरी ४६ वर्षे वयोगटातील दिसून येत आहेत.विशेष म्हणजे, काही नवतरूणांनीही आपले भाग्य आजमाविण्यासाठी रिंगणात उडी घेतली आहे.
यात अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातून ३० वर्षांचे अपक्ष उमेदवार अजय बडोले सर्वात तरूण उमेदवार ठरले आहेत. तर गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे ६९ वर्षीय विद्यमान आमदार व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपालदास अग्रवाल सर्वात जेष्ठ उमेदवार ठरले आहेत.
बापू व चंद्रिकापुरेंची षष्ठ्यब्दीपूर्ती
यंदा विधानसभा निवडणुकीत ४० ते ५० वर्षे वयोगटातील उमेदवारांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे.असताना मात्र जेष्ठ उमेदवारांची संख्या कमी असली तरीही ते रिंगणात दिसत आहेत. ६९ वर्षीय आमदार गोपालदास अग्रवाल सर्वात ज्येष्ठ उमेदवार ठरले असतानाच आमगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व आता अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असलेले रामरतनबापू राऊत तसेच अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार मनोहर चंद्रिकापुरे हे सुद्धा ज्येष्ठांच्या यादीत आहेत. बापू राऊत यांचे वय ६७ वर्षे असतानाच चंद्रिकापुरे हे ६४ वर्षांचे असून दोघांची षष्ठ्यब्दीपूर्ती झाली आहे.