खासदारानंतर आता आमदाराचा स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल
By अंकुश गुंडावार | Updated: September 13, 2024 10:59 IST2024-09-13T10:58:53+5:302024-09-13T10:59:17+5:30
Gondia : भाजपाचे आमदार ट्रॅक्टरच्या फावड्यात बसून नुकसानीची पाहणी करायला पोहचले

After the MP, now the MLA's stunt video is viral
गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. प्रशांत पडोळे यांचा गाडीच्या बोनेटवर बसून नुकसानीची पाहणी करीत असल्याचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर सध्या व्हायरल होत आहे. त्यातच आता भाजपाचे तिरोडा येथील आ. विजय रहांगडाले यांचा ट्रॅक्टरवर समोर लावलेल्या फावड्यात बसून नुकसानीची पाहणी करण्यासाचा व्हिडीओ शुक्रवारी (दि.१३) सोशल माध्यमांवर व्हायरल झाला. त्यामुळे विरोधकांनी त्यांना लक्ष केले आहे.
गोंदिया जिल्ह्य़ात सोमवार आणि मंगळवारी झालेल्या संततधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होवून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यावर या नुकसानीची पाहणी लोकप्रतिनिधी करीत आहेत. तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आ. विजय रहांगडाले यांनी गुरूवारी तिरोड़ा तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली. दरम्यान त्यांनी रस्त्यावर पाणी असल्याने ट्रॅक्टरच्या फावड्यात बसून नुकसानीची पाहणी केली. याचे फोटो आणि व्हिडिओ शुक्रवारी सोशल माध्यमांवर व्हायरल झाले. तसेच ही नुकसानीची पाहणी की स्टंटबाजी अशी टीका आ. रहांगडाले यांच्यावर होत आहे. गाडीच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी केल्याने कांग्रेस खा. डॉ. प्रशांत पडोळे यांच्यावर टीका केली जात असतांना आता भाजपा आ. रहांगडाले यांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ पुढे आल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे.