१७ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक
By नरेश रहिले | Updated: October 25, 2023 18:18 IST2023-10-25T18:18:30+5:302023-10-25T18:18:47+5:30
दवनीवाडा पोलिसात सन २००६ मध्ये विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या मुकेश हरिचंद कोकोडे, रा. सितुटोला याला १७ वर्षांनंतर २५ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली आहे.

१७ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक
गोंदिया : दवनीवाडा पोलिसात सन २००६ मध्ये विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या मुकेश हरिचंद कोकोडे, रा. सितुटोला याला १७ वर्षांनंतर २५ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली आहे. तो १७ वर्षापासून फरार होता. आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, तिरोडा यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले होते. परंतु त्यानंतर आरोपी न्यायालयात सतत गैरहजर राहत होता. त्याने लपून मध्यप्रदेशात राहायला सुरवात केली होती. त्यामुळे न्यायालयाने त्याचा स्थायी वारंट काढून दवनिवाडा पोलिसांना बजाविण्यास दिला होता.
पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी आरोपीला तत्काळ अटक करण्याच्या सूचना दवनिवाडाचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांना दिल्याने दवनिवाडा पोलीस पारंपारीक व तांत्रिक पद्धतींचा वापर करीत आरोपीचा शोध घेतला. त्याला खैरलांजी, मध्यप्रदेश येथून मोठ्या शिताफिने अटक करण्यात आली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात दवनिवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुखदेव राऊत, सहाय्यक फौजदार नामदेव अंबुले, पोलीस हवालदार धनेश्वर पिपरेवार, राजेश पारधी, गुलजार खवळे, सेवंत जांभुळकर, क्षीरसागर व मानकर यांनी केली आहे.