नदीवर आंघोळसाठी गेलेला विद्यार्थी बुडाला, तीन मित्र बचावले

By अंकुश गुंडावार | Updated: September 26, 2023 13:57 IST2023-09-26T13:56:39+5:302023-09-26T13:57:11+5:30

पांगोली नदीवरील घटना

A student who went for a bath in the river drowned, three friends survived | नदीवर आंघोळसाठी गेलेला विद्यार्थी बुडाला, तीन मित्र बचावले

नदीवर आंघोळसाठी गेलेला विद्यार्थी बुडाला, तीन मित्र बचावले

गोंदिया : शहरालगत वाहणाऱ्या पांगोली नदीवर मित्रांसह आंघोळीसाठी गेलेला एक विद्यार्थी नदीत बुडाल्याची घटना  मंगळवारी (दि.२६) सकाळच्या सुमारास घडली. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या शोध व बचाव पथकाच्या मदतीने नदीत बुडालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. 

प्राप्त माहितीनुसार शहरातील करिअर झोन या एज्युकेशन इन्स्टिट्युटचे चार विद्यार्थी मंगळवारी सकाळी शहरालगत  असलेल्या रेल्वे पुलाजवळील पांगोली नदीवर आंघोळीसाठी गेले होते. नदीमध्ये आंघोळ करीत असताना यशराज धिरेंद्रसिंह रघुवंशी (१७) हा विद्यार्थी नदीत बुडाला. तर तीन मित्र सुखरुप बचावले. त्याच्या मित्रांनी याची माहिती जवळ असलेल्या  नागरिकांना दिली. ग्रामीण पोलिस स्टेशन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूला मिळताच शोध व बचाव पथक घटनास्थळी पोहचत नदीत बुडालेल्या विद्यार्थ्याचा शोध घेणे सुरू केले आहे.

Web Title: A student who went for a bath in the river drowned, three friends survived