ट्रेडींगच्या नावावर ६३ लाखाची फसवणूक; आरोपी पळाला थायलंडला

By नरेश रहिले | Updated: February 25, 2025 17:10 IST2025-02-25T17:08:29+5:302025-02-25T17:10:04+5:30

Gondia : १० टक्के नफ्याचे आमिष देऊन लुबाडले

63 lakh fraud in the name of trading; The accused fled to Thailand | ट्रेडींगच्या नावावर ६३ लाखाची फसवणूक; आरोपी पळाला थायलंडला

63 lakh fraud in the name of trading; The accused fled to Thailand

नरेश रहिले 
गोंदिया:
स्टॉक मार्केटींग व फॉरेक्स मार्केटींगचा ऑनलाईन व्यापार करण्यासाठी पैसे दिल्यास १० टक्के व्याज देण्याच्या नावावर रामनगरातील एका महिलेकडून तब्बल ६३ लाखाने फसवणूक केली. या घटनेसंदर्भात गोंदियाच्या कुंभारटोली येथील तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला. पैसे घेऊन तो आरोपी थायलंडला पसार झाला.

दिनदयाल वार्ड, मनोहर कॉलोनी, रामनगर येथील सुनंदा महेंद्र रामटेके (४८) या महिलेने गोंदिया शहर पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार गोंदियाच्या कुंभारटोली येथील आरोपी अंकुश पृथ्वीराज कांबळे (२८) हा सुनंदा यांच्या मुलासोबत शिकला आहे. त्यामुळे त्याच्यासोबत त्यांंची जुनी ओळख आहे. १० ऑगस्ट २०२४ रोजी भाग्यवान शहारे हा अंकुश कांबळे ला घेवुन सुनंदा यांच्या घरी रामनगर येथे आला. अंकुश कांबळे याने त्याचा श्रीजी कॉप्लेक्स गोंदिया येथे त्याचा कार्यालय आहे, असे सांगुन त्याने आपले मोबाईलवर मी रोज १५ लाखापर्यंतचा व्यवहार करतो असे सांगितले. अंकुशने मी लोकांना १० टक्के व्याजप्रमाणे पैसे परत देतो तुम्ही मार्केटिंगमध्ये पैसे टाका, तुम्हाला सुध्दा १० टक्क्यांनी पैसे परत करीन असे म्हणाला. अंकुश कांबळे व भाग्यवान शहारे यांच्यावर विश्वास ठेवून सुनंदा यांनी ३७ लाख, त्याचा मुलगा अनिकेत याने १८ लाख तर मुलगी प्रेरणा हिच्याकडून ८ लाख असे ६३ लाख रूपये घेऊन त्यांची फसवणूक केली. आरोपीवर २४ फेब्रुवारी रोजी गोंदिया शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय तुपे करीत आहेत.
 

मायलेकांकडूनच घेतले ६३ लाख
सुनंदा रामटेके यांनी अंकुश याला प्रथम ५० हजार रूपये दिले, त्यानंतर अंकुश कांबळे याच्या सांगण्यावरुन त्याच्या अंकुश ट्रेडींग नावाचे खात्यामध्ये १३ ऑक्टोबर २०२४ रोजी ५ लाख रुपये, ४ सप्टेंबर २०२४ रोजी ५ लाख, १८ ऑकटोबर २०२४ रोजी ४ लाख, १९ ऑक्टोबरला २०२४ रोजी ५ लाख, ८ नोव्हेंबरला ३ लाख ७ जानेवारी २०२५ लाख ३ लाख रूपये असे एकूण २५ लाख आर.टी.जी.एस. व्दारे व १७ ऑगस्ट २०२४ रोजी १ लाख, ११ ऑक्टोबर २०२४ ला १ लाख, २ लाख नेफ्टव्दारे, ९ लाख ५० हजार रुपये वेगवेगळ्या तारखेस रोख दिले असे एकूण ३७ लाख रूपये त्याला दिले. मुलगी प्रेरणा महेंद्र रामटेके हिच्याकडुन २ लाख आरटीजीएसव्दारे व ६ लाख रुपये रोख असे एकुण ८ लाख रुपये, मुलगा अनिकेत यांच्या कडुन १३ लाख आरटीजीसव्दारे व ५ लाख रोख असे एकूण १८ लाख रुपये घेतले.

पैसे मागण्यासाठी गेल्यावर कळले तो गेला थायलंडला

रक्कमेची व्याज देण्याची वेळ आली तेव्हा सुनंदा रामटेके ५ जानेवारी २०२५ रोजी अंकुशला फोन केला तर अंकुशने सध्या कॅश नाही, ऑनलाईन पेमेंट करतो असे म्हणाला. परंतु खात्यावर पैसे टाकले नाही म्हणून मुलगा अनिकेत व जावई मिळुन अंकुश कांबळेच्या घरी गेले तेव्हा तो घरी मिळाला नाही. त्याच्या आईला अंकुशसंदर्भात विचारल्यावर तो थायलँडला गेला आहे. तो परत येवून सर्वांचे पैसे परत देईल असे त्याच्या आईने सांगितले. बरेच दिवस होवूनसुध्दा अंकुश परत आला नाही.

दुसऱ्याच्या तोंडून ऐकली गोष्ट अन् लावले पैसे
ऑगष्ट २०२४ च्या पहिल्या आठवडयात सुनंदा यांना भाग्यवान शहारे मिळाले. त्यांना काय काम सुरु आहे असे विचारपूस केल्यावर त्यांनी बल्ड लॅबचे व्यतीरिक्तों अंकुश कांबळे यांच्याकडे स्टॉक मार्केटिंग व फॉरेक्स मार्केटिंगमध्ये पैसे लावत असुन अंकुश आपल्याला प्रतिमाह १० टक्के व्याजप्रमाणे पैसे परत देत असल्याचे भाग्यवानने सुनंदाला सांगीतले होते. त्यामुळे त्यांनी अंकुशकडे पैसे गुंतवण्याचा चंग बांधला.
 

Web Title: 63 lakh fraud in the name of trading; The accused fled to Thailand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.