गोंदिया येथे ५० खाटांचे आयुष्य रुग्णालय मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 16:28 IST2025-03-18T16:27:23+5:302025-03-18T16:28:07+5:30

१५ कोटी रुपयांचा निधी : विनोद अग्रवाल यांची माहिती

50-bed Ayush Hospital approved in Gondia | गोंदिया येथे ५० खाटांचे आयुष्य रुग्णालय मंजूर

50-bed Ayush Hospital approved in Gondia

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
कोविड संकटाच्या काळात जिल्ह्यात आधुनिक वैद्यकीय सुविधांबरोबरच योग, आयुष काढा आणि नैसर्गिक उपचार पद्धतीची गरज प्रकर्षाने जाणवली. पण केटीएस आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयांमध्ये या उपचारांसाठी पुरेशी जागा नव्हती. ही अडचण लक्षात घेत, आ. विनोद अग्रवाल यांनी गोंदिया येथे आयुष्य रुग्णालय स्थापन करण्यात यावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. याचीच दखल घेत शासनाने ५० खाटांचे आयुष रुग्णालय मंजूर केले आहे.


शहरातील टीबी टोली परिसरातील जुन्या टीबी हॉस्पिटलच्या जागेवर हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी शासनाने १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या रुग्णालयाच्या उभारणीमुळे गोंदिया जिल्ह्यात आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडेल आणि नागरिकांना आधुनिक वैद्यकीय उपचारांसोबत आयुष पद्धतीचे उपचारही सहज उपलब्ध होतील. 


आयुष रुग्णालयात या सुविधा राहणार
- आयुष उपचार पद्धती-आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि योग उपचार
- होमिओपॅथी-नैसर्गिक पद्धतीने आजारांवर उपचार
- पंचकर्म चिकित्सा-शरीराला रोगमुक्त करण्यासाठी विशेष उपचार
- त्वचा विकार उपचार-त्वचारोगांवर आयुष पद्धतीद्वारे उपचार
- कान, नाक आणि घसा विकार उपचार
- योग आणि ध्यान केंद्र-शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी
- प्रजनन व शिशू आरोग्य विभाग-माता व बाल आरोग्यासाठी विशेष सेवा
-बाह्य व आंतररुग्ण विभाग-सर्वसमावेशक आयुष उपचारांसाठी


"या रुग्णालयाच्या मंजुरीसाठी प्रयत्न करून जिल्ह्याच्या जनतेसाठी मोठी भेट दिली आहे. हे रुग्णालय केवळ गोंदियाच्या नागरिकांसाठीच नव्हे, तर आसपासच्या भागांतील रुग्णांसाठीही अत्यंत लाभदायक ठरेल."
- विनोद अग्रवाल, आमदार

Web Title: 50-bed Ayush Hospital approved in Gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.