अस्वलाच्या हल्ल्यात २ जण गंभीर जखमी
By अंकुश गुंडावार | Updated: January 10, 2024 15:07 IST2024-01-10T15:06:55+5:302024-01-10T15:07:11+5:30
खैरी/सुकळी शेतशिवारातील घटना

अस्वलाच्या हल्ल्यात २ जण गंभीर जखमी
अर्जुनी - अस्वलाच्या हल्ल्यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 8 जानेवारीला सुमारे चार वाजताच्या दरम्यान घडली आहे. ही घटना शेतात काम करत असताना घडली असून, जखमी झालेल्यांची नावं हितेश केशव गावडकर मु.खैरी/सुकळी(६४), दुलाराम मोतीराम भोयर मु. खैरी/सुकळी अशी आहेत. दोघेही नामक युवक स्थानिक खैरी/सुकळी येथील शेत शिवारात काम करत असताना घडली, अस्वलाने हल्ल्या केल्यावर ते दोन्ही युवक गंभीर जखमी झाले असून,दोघांनाही गंभीर दुखापत झाली होती.
अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर झालेल्या त्या दोन्ही युवकांना सुमारे साडेपाच वाजताच्या दरम्यान ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे दाखल करण्यात आले असून, त्या दोन्हीही युवकांवर डॉक्टर नितीन तिरपुडे(वैद्यकीय अधिकारी अर्जुनी मोरगाव),डॉ.डी. एन. कापगते(वैद्यकीय अधिकारी अर्जुनी मोरगाव),तसेच डॉ. प्रांजल पंपालिया(वैद्यकीय अधिकारी अर्जुनी मोरगाव),यांनी उपचार केला असून,त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.