विद्युत धक्क्याने १६ वर्षीय बालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 22:31 IST2025-06-26T22:31:09+5:302025-06-26T22:31:53+5:30

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

16 year old boy dies of electric shock in amgaon | विद्युत धक्क्याने १६ वर्षीय बालकाचा मृत्यू

विद्युत धक्क्याने १६ वर्षीय बालकाचा मृत्यू

आमगाव : फर्निचरच्या दुकानात काम करीत असलेल्या एका १६ वर्षीय बालकाचा विद्युत धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.२६) सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास आमगाव येथे घडली. रोहित वसंत निखारे (१६) रा. शिवणी असे विद्युत धक्का लागून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार रोहित हा दहावीची परीक्षा आटोपल्यानंतर उन्हाळ्याच्या सुटीत काहीतरी काम शिकावे व कुटुंबाला हातभार लावता यावा म्हणून त्याने आमगाव येथील एका फर्निचरच्या दुकानात काम शिकण्यासाठी जाण्यास सुरुवात केली होती. वडिलाचे निधन झाल्याने घरी आई, एक बहीण असे तीनजण राहत होते. रोहित नेहमीप्रमाणे गुरुवारी कामावर गेला.

दुकानाच्या माळ्यावर फर्निचर तयार करण्याचे काम करीत असताना सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास त्याच्या हातातील दहा ते पंधरा फूट असलेली ॲल्युमिनियमच्या राॅडचा विद्युत ताराला स्पर्श झाल्याने रोहितला विद्युत धक्का लागला. तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला त्वरित आमगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी रोहितची तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: 16 year old boy dies of electric shock in amgaon

टॅग्स :amgaon-acआमगाव