गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास १४ वर्षाचा सश्रम कारावास; प्रमुख व जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

By नरेश रहिले | Updated: July 19, 2023 19:16 IST2023-07-19T19:16:17+5:302023-07-19T19:16:41+5:30

रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सतोना येथील एका गतिमंद मुलीशी अनैतिक संबंध ठेवून तिला गर्भवती केले.

14-year rigorous imprisonment for murderer who molested disabled girl | गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास १४ वर्षाचा सश्रम कारावास; प्रमुख व जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास १४ वर्षाचा सश्रम कारावास; प्रमुख व जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

 गोंदिया : रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सतोना येथील गतिमंद मुलीवर मे २०२१ मध्ये अतिप्रसंग करणाऱ्या आरोपी दुर्गसाय उर्फ मोंटू जियालाल चौधरी रा. सतोना याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ वर्षाचा सश्रम कारावास व १५ हजार रूपये दंड ठोठावला आहे. ही सुनावणी १९ जुलै रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वानखेडे यांनी केली आहे.

रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सतोना येथील एका गतिमंद मुलीशी अनैतिक संबंध ठेवून तिला गर्भवती केले. या संदर्भात दुर्गसाय चौधरी याच्यावर रावणवाडी पोलीस ठाण्यात १६ ऑक्टोबर २०२१ रोजी भादंविच्या कलम ३७६, ३६७ (२) (जे) (एल) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी विरूद्ध सबळ साक्ष पुरावे गोळा करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सरवदे यांनी केला होता. खटल्याचा युक्तीवाद सरकारी अभियोक्ता पाटणकर यांनी केला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस नायक कुर्वे यांनी सहकार्य केले.

Web Title: 14-year rigorous imprisonment for murderer who molested disabled girl