सुधारणा-केंद्रित आणि लोकाभिमुख, 'विकसित भारत बजेट'चे स्वागत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 07:41 IST2026-02-02T07:34:10+5:302026-02-02T07:41:35+5:30
विद्यार्थी व मान्यवर यांच्यासमवेत पाहिले बजेटचे थेट प्रक्षेपण

सुधारणा-केंद्रित आणि लोकाभिमुख, 'विकसित भारत बजेट'चे स्वागत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शासकीय महाविद्यालय, खांडोळा व सांखळी येथील शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांसह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला (विकसित भारत अर्थसंकल्प) थेट प्रक्षेपणाद्वारे पाहिला.
अर्थसंकल्पाचे स्वागत करताना ते म्हणाले की, 'हा अर्थसंकल्प धाडसी, सुधारणा-केंद्रित आणि लोकाभिमुख असून, लोकप्रियतेपेक्षा लोककल्याण या तत्त्वज्ञानाचे स्पष्ट प्रतिबिंब आहे. वित्तीय शिस्त राखत विकासावर भर देणारा हा अर्थसंकल्प सार्वजनिक गुंतवणुकीवरील विश्वास अधिक दृढ करतो आणि भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेकडे नेतो.'
सावंत म्हणाले की, 'पायाभूत सुविधा निर्मिती, लॉजिस्टिक्स, रेल्वे आणि शहरी विकासाला मोठी चालना देईल. तसेच सात उत्पादन क्षेत्राला क्षेत्रांमध्ये दिलेला प्रोत्साहनात्मक पाठिंबा एमएसएमई,रोजगारनिर्मिती आणि देशांतर्गत मूल्यसाखळी मजबूत करण्यास मदत करेल. इंडिया सेमीकंडक्टर मिशन २.० च्या प्रारंभाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, फुल-स्टैंक डिझाईन, भारतीय बौद्धिक संपदा आणि पुरवठा साखळीला दिलेला पाठिंबा हा तंत्रज्ञान क्षेत्रातील आत्मनिर्भरतेकडे टाकलेले निर्णायक पाऊल आहे.'
आरोग्य क्षेत्राबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, बायोफार्मा शक्ती उपक्रम, क्लिनिकल ट्रायल नेटवर्क आणि वैद्यकीय पर्यटन केंद्रांमुळे भारताला परवडणाऱ्या व दर्जेदार आरोग्यसेवा आणि जैविक औषधांचे जागतिक केंद्र म्हणून ओळख मिळेल.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या विकसितचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वागत केले आहे. हे बजेट धाडसी, सुधारणा-केंद्रित आणि लोकाभिमुख असून लोकप्रियतेपेक्षा लोककल्याण या तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वित्तीय शिस्त राखत विकासाला गती देणारे हे बजेट सार्वजनिक गुंतवणुकीवरील विश्वास अधिक मजबूत करते आणि भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेकडे नेण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरते, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले. मुख्यमंत्रीडॉ. सावंत यांनी पंतप्रधानांचे हार्दिक अभिनंदन केले.
नारळ उत्पादक राज्यांवर विशेष लक्ष देणे, भारतीय काजू व नारळ क्षेत्राला बळकटी देणे, कृषी-प्रक्रिया उद्योगांचा विकास, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि किनारपट्टी अर्थव्यवस्थेला चालना देणे हेही या बजेटचे सकारात्मक पैलू असल्याचे त्यांनी सांगितले.
भांडवली खर्चात करण्यात आलेली ऐतिहासिक वाढ, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स, रेल्वे आणि शहरी विकासाला नवसंजीवनी देईल. सात रणनीतिक क्षेत्रांमध्ये उत्पादन क्षेत्राला दिलेले व्यापक प्रोत्साहन एमएसएमई, रोजगारनिर्मिती आणि देशांतर्गत मूल्यसाखळी मजबूत करेल. बायोफार्मा शक्ती उपक्रम, नायपर संस्थांचा विस्तार, क्लिनिकल ट्रायल नेटवर्क आणि वैद्यकीय पर्यटन केंद्रांच्या विकासामुळे भारत किफायतशीर, उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा आणि जैविक औषधांचा जागतिक केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
