जागा गरिबांसाठी, शाळेत प्रवेश मात्र मिळतोय श्रीमंतांच्या मुलांना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 18:55 IST2025-07-03T18:54:41+5:302025-07-03T18:55:10+5:30

'आरटीई' मोफत प्रवेश प्रक्रिया : १०० विद्यार्थ्यांनी फिरवली प्रवेशाकडे पाठ

The place is for the poor, but the children of the rich are getting admission in the school! | जागा गरिबांसाठी, शाळेत प्रवेश मात्र मिळतोय श्रीमंतांच्या मुलांना !

The place is for the poor, but the children of the rich are getting admission in the school!

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता 'आरटीई' प्रवेश प्रक्रियेअंतर्गत गरीब व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातील खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, असे असतानाही जिल्ह्यात उपलब्ध ५०० जागांपैकी ३०७जागांवरच प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, उर्वरित १२५ जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रवेश घेतलेल्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी श्रीमंत व सधन घरातील असल्याचे दिसून येत आहे.


शैक्षणिक सत्र २०२५-२६साठी
एकूण ९३४ अर्ज प्राप्त झाले होते. आतापर्यंत जिल्ह्यात आरटीई प्रवेशाच्या चार याद्या जाहीर करण्यात आल्या, यामध्ये ४३२ विद्यार्थ्यांची वर्ग पहिलीच्या प्रवेशासाठी निवड झाली. त्यापैकी ३०७विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला असल्याची माहिती पोर्टलवर दिसून आली. 


रिक्त जागा राहण्याची नेमकी कारणे काय ?
शाळांचे अंतर : अनेक पालकांनी पसंतीची शाळा न मिळाल्याने, तसेच शाळेचे अंतर दूर होत असल्याने प्रवेश घेण्यास उत्सुकता दाखवली नाही.


खोटे कागदपत्रे जोडली
काही प्रकरणांमध्ये प्रवेशासाठी खोटी कागदपत्रे जोडल्यानेही पडताळणीवेळी त्यांना अपात्र ठरविल्यानेही काही जागा रिक्त राहिल्या. दोन वर्षापूर्वी गडचिरोली शहरात तपासणीदरम्यान खोटे पत्ते दिल्याचे उघड झाल्यानंतर प्रवेश रद्द करण्यात आले होते.


चारवेळा संधी तरी प्रतिसाद नाही
या प्रक्रियेत नियमित आणि प्रतीक्षा यादीसह चार फेऱ्या राबविण्यात आल्या, निवड होऊनसुद्धा अनेक पालकांनी प्रवेश घेतला नाही. यामुळेच प्रवेशाच्या शंभरवर जागा रिक्त राहिल्या, तर दुसरीकडे इच्छुकांना लॉटरीच न लागल्याने त्यांना प्रवेश प्रक्रियेपासून दूर राहावे लागले आहे.


आरटीईअंतर्गत किती शाळांसाठी किती अर्ज आले?
आरटीई प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यात यंदा ६२ शाळांमध्ये राबविण्यात आली. यामध्ये ५०० जागांसाठी ९३४ अर्ज दाखल झाले होते. मागील वर्षीपेक्षा शाळा आणि जागांची यावर्षी वाढ करण्यात आली होती. मात्र, तरीही यावर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले नाही.


१२५ जागा रिक्त
पसंतीची शाळा न मिळाल्याने जवळपास १२५ जागा यावर्षी रिक्त राहिल्या आहेत.

Web Title: The place is for the poor, but the children of the rich are getting admission in the school!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.