लाडक्या बहिणीला दीड हजार मिळाले; मोफत गॅस सिलिंडर कधी मिळणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 13:56 IST2024-09-26T13:55:30+5:302024-09-26T13:56:00+5:30
लाभार्थ्यांना प्रतीक्षा : दोन महिन्यांच्या अर्थसाहाय्यापासून ५० हजारांवर महिला वंचित

Beloved sister received a thousand and a half; When will you get free gas cylinders?
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : " 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमहिना दीड हजार आणि वर्षाला तीन मोफत सिलिंडर देण्याची घोषणा राज्य सरकारने केली.
या घोषणेला महिनाभराचा कालावधी उलटला; परंतु अजूनपर्यंत योजनेची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे 'लाडक्या बहिणीं'ना लाभाची प्रतीक्षाच आहे. गरीब व गरजू महिलांचे सक्षमीकरण व्हावे, तसेच त्यांना आरोग्य जपण्यासाठी आर्थिक साहाय्य लाभावे, यासाठी राज्य शासनाच्या वतीने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना लागू केली. जुलै व ऑगस्ट महिन्याचे अर्थसाहाय्य महिलांच्या बँक खात्यात वळते करण्यात आले; परंतु त्यानंतर घोषणा केलेल्या मोफत सिलिंडरचा लाभ अजूनपर्यंत महिलांना देण्यात आलेला नाही.
सदर लाभ कधी मिळणार, याची प्रतीक्षा जिल्हाभरातील लाभार्थी महिलांना आहे. अनेक नागरिक गॅस एजन्सीत सिलिंडरबाबत चौकशी करीत आहेत. शासनाने लवकर मोफत सिलिंडर योजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी महिलांनी केली.
लाडकी बहीण' योजनेचे पावणेदोन लाख लाभार्थी
जिल्ह्यात लाडकी बहीण' योजनेचे पावणेदोन लाख लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांपैकी अजूनपर्यंत ५० हजारांवर लाभार्थ्यांना तीन हजार रुपयांचा लाभ मिळालेला नाही.
लाडक्या बहिणीला महिन्याला दीड हजार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना प्रतिमहिना १ हजार ५०० रुपये याप्रमाणे लाभाचे वितरण केले जात आहे. आतापर्यंत दोन महिन्यांचा लाभ महिलांना थेट बैंक खात्यात वितरित करण्यात आलेला आहे.
वर्षाला तीन सिलिंडर
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत महिलांना दर वर्षाला तीन सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. या योजनेमुळे महिलांना गॅस सिलिंडरवर होणारा खर्च बचत करता येईल. ग्रामीण भागातील बहुतांश महिलांकडे गॅस सिलिंडर आहेत. उज्वला योजनेतून सदर सिलिंडर प्राप्त झाले. काही सिलिंडर वन विभागाच्या योजनेतून मिळालेले आहेत.
"तीन सिलिंडर मोफत सिलिंडर मोफत देण्याबाबत अजूनपर्यंत निर्देश प्राप्त झालेले नाहीत. आरमोरी तालुक्यात उज्ज्वला योजनेचे १३ हजार ५९६ तर अन्य महिलांच्या नावे ४ हजार ३०० असे एकूण १७ हजार ८९६ कनेक्शन आहेत."
- प्रदीप हजारे, गॅस एजन्सीचालक, आरमोरी