Maaza Modak: सुपर शेफ अर्चना आर्ते शिकवणार चवदार चविष्ट मोदक; पाहा थोड्याच वेळात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 12:37 IST2020-08-24T12:22:51+5:302020-08-24T12:37:46+5:30
गणेशोत्सवानिमित्त माझा आणि लोकमतची माझा मोदक स्पर्धा

Maaza Modak: सुपर शेफ अर्चना आर्ते शिकवणार चवदार चविष्ट मोदक; पाहा थोड्याच वेळात
दरवर्षी धुमधडाक्यात साजरा होणाऱ्या गणेश उत्सवाने जगभरात नावलौकिक मिळवला आहे. वर्षभरात घडणारे वाईट प्रसंग, दुःख, कष्ट, यातना, संकटांना विसरून सर्वच मंडळी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सवावरील निर्बंधांचे पालन करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. गणपती बाप्पा मोरया या, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात व भक्तिमय वातावरणात घरोघरी बाप्पांचे मोठ्या उत्साहात आगमन झाले.
घरोघरी श्रींच्या आगमनाने प्रसन्नता अनुभवायला मिळत आहे. गणेशोत्सवात बाप्पाच्या आणि तुम्हा-आम्हा सगळ्यांच्या आवडीचे मोदक हे हमखास केले जातात. घरोघरी गृहिणी नावीन्यपूर्ण मोदक आणि मेजवानी कशी करता येईल या विचारात असतात. लाडक्या बाप्पाला मोदकांचा नैवद्य दाखवला जातो. वेगवेगळ्या पद्धतीने मोदक करण्याकडे हल्ली अधिक कल असतो. 'लोकमत' आणि 'माझा' एकत्र येऊन 'माझा मोदक स्पर्धे'च्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि लाईव्ह कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत.
यंदाचा गणोशोत्सव खास करण्यासाठी आणि मोदक आणखी स्वादिष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी माझा मोदक रेसिपी शो घेऊन आलोय. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुपर शेफ गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवत आहेत. २१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे. २१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे.
प्रसिद्ध शेफनी या कार्यक्रमात सहभागी होऊन प्रेक्षकांना चवदार-चविष्ट मोदक करून दाखवले आहेत. लोकप्रिय शेफ निलेश लिमये, भारती म्हात्रे आणि मधुरा बाचल यांनी मोदकाच्या काही हटके रेसिपी याआधी करून दाखवल्या आहेत. चविष्ट आणि तोंडाला पाणी आणणाऱ्या रेसिपींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सुपर शेफ मधुरा बाचल यांनी 'हलबाई माझा मोदक' तयार केले होते. तर विविध चविष्ट खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय असलेल्या शेफ भारती म्हात्रे यांनी 'पनीर माझा मोदक' तयार केले आहेत.
आपल्या पदार्थांमुळे प्रचंड लोकप्रिय असलेले सेलिब्रिटी शेफ निलेश लिमये यांनी 'माझासोबत उकडीचे मोदक' करून दाखवले आहेत. माझा मोदक रेसिपी शो हा घरबसल्या लाईव्ह पाहता येणार आहे. यामध्ये आज प्रतिभावान शेफ अर्चना आर्ते यांचा सहभाग असणार आहे. अर्चना अर्ते या महाराष्ट्रातील प्रसिद्ध शेफ असून त्या आपल्या खाद्यपदार्थांमुळे जगभरात लोकप्रिय आहेत. अर्चना यांचं स्वत:चं यूट्यब चॅनल असून त्यांच्या सबस्क्रायबर्सची संख्या प्रचंड आहे. त्यामुळेच आज त्या प्रेक्षकांना कोणत्या प्रकारचे मोदक करून दाखणार आहेत याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
अर्चना आर्ते यांनी केलेल्या स्वादिष्ट मोदक रेसिपी पाहण्यासाठी दुपारी ४ वाजता https://www.youtube.com/Lokmat, https://www.youtube.com/TastySafar/ आणि Lokmat.com/MaazaModak या वेबसाईटला भेट द्या.
माझानं तुमच्यासाठी माझा मोदक स्पर्धादेखील आणली आहे. #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुमच्या रेसिपींचे व्हिडीओ lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्यांना अॅपल आयफोन ७ आणि त्यानंतरच्या पाच विजेत्यांना अॅमेझॉन इको डॉट (सेकंड जनरेशन) बक्षीस म्हणून मिळेल.
रेसिपी करायला आतूर झाला आहात?... तुम्हीही बनवू शकता झक्कास माझा मोदक. www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझा खरेदी करा आणि आपल्या साहित्यासह सज्ज व्हा!
'MAAZAMODAK' हा कोड वापरा आणि १.२ लिटरच्या बॉटलवर/बाटलीवर मिळवा १०% सूट. आजच खरेदी करा!