Ganesh Festival 2019 : हटके पद्धतीने असे तयार करा बाप्पाला आवडणारे मोदक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 14:40 IST2019-09-04T14:38:28+5:302019-09-04T14:40:42+5:30
घराघरांत गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. अशातच बाप्पाच्या बाप्पाला नैवेद्यासाठी काय करायचं? हा अनेकांना पडलेला प्रश्न. अशावेळी नैवेद्यासाठी बऱ्याचदा बाजारातून पदार्थ आणले जातात.

Ganesh Festival 2019 : हटके पद्धतीने असे तयार करा बाप्पाला आवडणारे मोदक!
घराघरांत गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. अशातच बाप्पाच्या बाप्पाला नैवेद्यासाठी काय करायचं? हा अनेकांना पडलेला प्रश्न. अशावेळी नैवेद्यासाठी बऱ्याचदा बाजारातून पदार्थ आणले जातात. पण तुम्ही वेगळ्या आणि हटके स्टाइलचे चविष्ट मोदक घरच्या घरी तयार करू शकता. जाणून घेऊयात अशाच हटके मोदकांची रेसिपी...
तुम्ही खोबरं आणि खव्याचे मोदक घरीच झटपट करू शकता. जाणून घेऊया या वेगळ्या आणि चविष्ट मोदकांची रेसिपी...
साहित्य :
- खोबरे एक वाटी
- रवा अर्धी वाटी
- खवा अर्धी वाटी
- साखर १ वाटी,
- तूप
कृती :
- मैदा घेऊन मोदक तयार करण्यासाठी कणीक मळून घ्या.
- खोबरं खवून घ्या.
- खवलेलं खोबरं, रवा, खवा, साखर एकत्र करून सारण तयार करा.
- मळलेली कणीक घेऊन त्याच्या पाऱ्या तयार करा आणि त्यामध्ये सारण भरून त्याला मोदकाचा आकार द्या.
- तयार मोदक मंद आचेवर तळून घ्या.
- घरच्या घरी तयार होतील असे मैद्याचे मोदक तयार आहेत.