Ganesh Chaturthi 2020 : बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'या' 5 प्रकारचे मोदक झटपट करा तयार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 16:20 IST2020-08-20T15:20:57+5:302020-08-20T16:20:11+5:30
बाप्पा घरी आले की त्याला नैवेद्य दाखवण्यासाठी घराघरांमध्ये मोदक केले जातात. पण अनेकजण बाजारातून मोदक विकत आणतात.

Ganesh Chaturthi 2020 : बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'या' 5 प्रकारचे मोदक झटपट करा तयार!
एखादं नवीन काम सुरू करण्याआधी श्रीगणेशाची पूजा करण्यात येते. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाला मोदक फार आवडतात. अशातच बाप्पा घरी आले की त्याला नैवेद्य दाखवण्यासाठी घराघरांमध्ये मोदक केले जातात. पण अनेकजण बाजारातून मोदक विकत आणतात. सणासुदीच्या काळात बाजारामध्ये अनेकदा भेसळयुक्त पदार्थही मिळतात असं आपण अनेकदा ऐकतो. अशावेळी बाप्पाचा नैवेद्य घरीच तयार केला तर भेसयुक्त पदार्थांपासून आपण दूर राहू शकतो.
अनेकदा घरी नैवेद्यासाठी उकडीचे मोदक तयार करण्यात येतात. पण बाप्पाला दररोज उकडीच्या मोदकांचाच नैवेद्य दाखवण्याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार करून त्यांचा नैवेद्य दाखवू शकता. जाणून घेऊया बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास मोदकांचे प्रकार. हे व्हिडीओ पाहून तुम्ही झटपट बाप्पासाठी नैवेद्य करू शकता.
१) उकडीचे मोदक
२) तळलेले मोदक
३) चॉकलेट मोदक
४) मावा मोदक
५) खोबऱ्यांचे मोदक
हे पण वाचा-
चहासोबत कुरकुरीत मक्याची भजी खाल तर खातच राहाल; नक्की ट्राय करा 'ही' चमचमीत रेसिपी
चवीला एकदम बढीया; खमंग, खुसखुशीत अळूवड्या, एकदा खाल खातच रहाल.....