Ganesh Chaturthi 2019 : गणरायाच्या नैवेद्यासाठी खास चॉकलेट आणि बदामाचे पेढे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 13:59 IST2019-08-31T13:58:09+5:302019-08-31T13:59:00+5:30
बाप्पाच्या प्रसादासाठी फक्त मोदक करण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळे पदार्थ ट्राय करू शकता. तुम्ही चॉकलेट आणि बदामाचे पेढे ट्राय करू शकता. घरच्या घरी अगदी कमी वेळात तयार करता येणारे हे पेढे फार चविष्ट असतात.

Ganesh Chaturthi 2019 : गणरायाच्या नैवेद्यासाठी खास चॉकलेट आणि बदामाचे पेढे!
गणपती बाप्पा येणार म्हणजे, सगळीकडे प्रसन्न वातावरण असतं. बाप्पाची आरास, बाप्पाचा नैवेद्य सारं काही करण्यात दिवस कसा जातो काही समजतंच नाही. अशातच तुमच्याही मनात बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी कोणते खास पदार्थ तयार करायचे? हा प्रश्न असेल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. बाप्पाच्या प्रसादासाठी फक्त मोदक करण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळे पदार्थ ट्राय करू शकता. तुम्ही चॉकलेट आणि बदामाचे पेढे ट्राय करू शकता. घरच्या घरी अगदी कमी वेळात तयार करता येणारे हे पेढे फार चविष्ट असतात. जाणून घेऊयात चॉकलेट बदाम पेढे तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- बदाम 250 ग्रॅम (भिजवून घ्या)
- तूप (आवश्यकतेनुसार)
- कोको पावडर 2 मोठे चमचे
- कंडेंस्ड मिल्क 100 ग्रॅम
- बारिक कापलेले बदाम
- साखर आवश्यकतेनुसार
कृती :
- चॉकलेट बदामाचे पेढे तयार करण्यासाठी सर्वात आधी बदामाची साल काढून बारिक करून घ्या. एक कढई मध्यम आचेवर ठेवा त्यामध्ये तूप टाका. तूप गरम होईपर्यंत त्यामध्ये कंडेस्ड मिल्क आणि कोको पावडर टाकून मिक्स करा. फक्त हे एकत्र करताना त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत ही काळजी घ्या.
- तयार मिश्रणामध्ये बदामाची पेस्ट टाका आणि एकत्र करून घ्या.
- कढईमध्ये तूप गरम झाल्यावर तयार मिश्रण थोडं शिजवून घ्या.
- त्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी असल्यास तुम्ही साखर टाकू शकता.
- मिश्रण शिजल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवून द्या.
- थंड झाल्यानंतर हाताने पेढ्यांप्रमाणे छोटे गोळे वळून घ्या.
- त्यावर बारिक कापलेले बदाम लावा, पेढे तयार आहेत.