Join us

Video: कपाळावर 30kg वजन अन् मानेवर 82kg...; विद्युत जामवालची ट्रेनिंग पाहून चकीत व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 17:20 IST

अभिनेता विद्युत जामवाल नेहमीच धोकादायक स्टंट आणि मार्शल आर्ट्सचे व्हिडिओ शेअर करत असतो.

Vidyut Jammwal: अभिनेता विद्युत जामवाल त्याच्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असतो. त्याच्या अप्रतिम फिटनेसचे आणि मार्शल आर्ट्सची झलक, त्याच्या चित्रपटांमधून चाहत्यांना पाहायला मिळते. कमांडो फ्रँचायझीसह सनक, खुदा हाफिज आणि जंगलीसारख्या चित्रपटांमध्ये विद्युतने जबरदस्त अॅक्शन सीन्स दिले आहेत. विद्युत एक मोठा सुपरस्टार बनु शकला नाही, पण त्याचा एक मोठा चाहतावर्ग आहे. तो चाहत्यांसाठी नेहमी सोशल मीडियावर विविध स्टंट्स आणि मार्शल आरर्ट्सचे व्हिडिओ शेअर करत असतो. 

दरम्यान, विद्युतने अलीकडेच इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओने सर्वांना चकीत केले आहे. या व्हिडिओमध्ये तो अशी गोष्ट करताना दिसतोय, ज्याचा कुणी विचारही करणार नाही. व्हिडिओमध्ये विद्युतने मानेच्या व्यायामाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये विद्युत आपल्या कपाळावर 30 किलो वजनाचा डंबेल ठेवतो. तो इथेच थांबत नाही.

पुढे तो जमिनीवर पालथा झोपलेला दिसतोय आणि एक माणूस त्याच्या डोक्यावर एक पाय ठेवून उभा राहतोय. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती त्याचे संपूर्ण वजन विद्युतच्या चेहऱ्यावर देतोय. पाय ठेवलेल्या व्यक्तीचे वजन 82 किलो आहे. ही आगळीवेगळी ट्रेनिंग पाहून चाहते चकीत झाले आहेत. विद्युतने यापूर्वीही धोकादायक स्टंट आणि मार्शल आर्ट्सचे व्हिडिओ शेअर केले आहेत. 

टॅग्स :विद्युत जामवालबॉलिवूडइन्स्टाग्रामसोशल व्हायरलसोशल मीडिया