Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रुदाली' म्हटल्याने वाईट वाटलं असेल तर मी कंगनाची माफी मागायला तयार' - उर्मिला मातोंडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 14:23 IST

आता उर्मिलाला हा वाद वाढवण्यात अजिबात इंटरेस्ट दिसत नाही. उर्मिलाने एका मुलाखतीत कंगनाला 'रुदाली' म्हटलं होतं .

कंगना रणौत इतर कलाकारांप्रमाणे अभिनेत्री उर्मिला मातोंडकरवरही नाराज आहे. दोघींमध्ये होणारी तू-तू-मैं-मैं सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पण आता उर्मिलाला हा वाद वाढवण्यात अजिबात इंटरेस्ट दिसत नाही. उर्मिलाने एका मुलाखतीत कंगनाला 'रुदाली' म्हटलं होतं . आता ती म्हणाली की, याचं कंगनाला वाईट वाटलं असेल तर ती माफी मागायला तयार आहे.

एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला म्हणाली की, तिने कंगनाला रुदाली एका खास संदर्भात म्हटलं होतं. आणि जर तिला याचं वाईट वाटलं असेल तर ती यावर तिची माफी मागायला तयार आहे. मी कंगनाची माफी मागून काही लहान होणार नाही.

उर्मिला म्हणाली की, तिने तो शब्द केवळ तिने यासाठी वापरला होता. कारण तिला हे कळत नव्हतं की एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा विक्टिम कार्ड का खेळत आहे. तिला वाटतं की, असं तर कुणीही करू शकतं.

कंगनाने उर्मिलाला म्हटलं होतं 'सॉफ्ट पॉर्न स्टार'

कंगना आणि उर्मिलातील वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा उर्मिला कंगनाच्या महाराष्ट्र आणि ड्रग्सच्या वक्तव्यावर म्हणाली होती की तिने सुरूवात तिच्या हिमाचल राज्यापासून करावी. यावर नाराज कंगनाने टाइम्स नाउला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटलं होतं. कंगनाच्या या टिकेवर सोशल मीडियातून निषेध व्यक्त होत आहे. 

काय म्हणाली होती उर्मिला?

कंगना राणौतने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधले होते. त्यानंतर तिला खूप विरोध झाला होता. याशिवाय कंगनाने म्हटले होते की बॉलिवूडमध्ये असे कित्येक लोक आहेत जे ड्रग्सचं सेवन करतात आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. या विधानांवर उर्मिला मातोंडकरने कंगनाला चांगलेच सुनावले. उर्मिला म्हणाली की, संपूर्ण देश ड्रग्स समस्याने पीडित आहे. काय कंगनाला माहित नाही आहे की हिमाचल ड्रग्सचा गड आहे? तिला ही लढाई आपल्या गृह राज्यातून सुरू केली पाहिजे.

कंगनाने केला होता पलटवार

कंगना राणौत उर्मिला मातोंडकरवर पलटवार करत म्हणाली की, माझ्या स्ट्रगलची थट्टा करते आहे. कंगनाने उर्मिलावर खासगी हल्ला करत तिला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटले. इतकेच नाही तर त्याशिवाय उर्मिला आपल्या अभिनयासाठी ओळखली जात नाही, असेही कंगनाने म्हटले.

'भांडणाची सुरूवात मी करत नाही, पण संपवते मीच', कंगना रणौतचा शिवसेनेला इशारा?

अनुराग-कंगनात पेटलं ट्विटर वॉर, म्हणाली - इतका मंदबुद्धी कधीपासून झालास...

कंगनाने 'सॉफ्ट पॉर्न स्टार' म्हटल्यावर, उर्मिला मातोंडकरसाठी धावून आला राम गोपाल वर्मा

BMC वर भडकली कंगना, ऑफिसचे फोटो शेअर करत म्हणाली - 'हा माझ्या स्वप्नांचा बलात्कार'

टॅग्स :उर्मिला मातोंडकरकंगना राणौतबॉलिवूड