Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीव्ही कपलने मोडला साखरपुडा, सोशल मीडियावरुन सर्व फोटोही केले डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 13:54 IST

तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर झाले वेगळे

एकीकडे मनोरंजनविश्वात लग्नाचे वारे वाहत असतानाच दुसरीकडे एका कपलने साखरपुडा मोडला आहे.'शिव शक्ती- ताप तांडव त्याग' फेम अभिनेत्री सुभा राजपूतने (Subha Rajput)  तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेता विभव रायसोबत (Vibhav Roy) साखरपुडा केला होता. 25 डिसेंबर 2022 रोजीच ते एंगेज झाले होते. मात्र आता दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सोशल मीडियावरुन साखरपुड्याचे फोटोही डिलीट केलेत. 

सुभा राजपूत आणि विभव राय 2019 साली 'प्यार इश्क रेंट' या वेबसीरिजच्या शूटवेळी त्यांची ओळख झाली. दोघांमध्ये हळूहळू मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले. ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, सुभा आणि विभव यांनी एकमेकांच्या सहमतीने नातं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. आयुष्यात आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी हव्या असल्याची जाणीव त्यांना झाली. दोघांसाठी हा निर्णय नक्कीच कठीण होता पण हेच योग्य होतं. विभवने सध्या यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर सुभाने वैयक्तिक आयुष्यावर बोलू इच्छित नाही असे सांगितले. 

विभव रायने 'गुस्ताख दिल','कुछ तो है तेरे मेरे दरमिया' सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या तो 'शैतानी रस्मे' मध्ये दिसत आहे. तर सुभाने 'इश्कबाज' मालिकेत काम केले आहे. सध्या ती 'शिव शक्ती' मालिकेत देवी शक्तीच्या भूमिकेत दिसत आहे. ही मालिका टीआरपीमध्ये  सलग टॉप 5 मध्ये आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसोशल मीडियारिलेशनशिपलग्न