Join us

'द फॅमिली स्टार' सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित, कुठे पाहू शकता, घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 13:27 IST

आता घरबसल्या हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. 

अभिनेता विजय देवराकोंडा आणि मृणाल ठाकूरच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे.  'द फॅमिली स्टार' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.  रोमँटिक कॉमेडी असलेला हा चित्रपट सिनेमागृहात ५ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. थिएटरमध्येनंतर आता ओटीटीवर रीलिज झाला आहे. आता घरबसल्या हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. 

'द फॅमिली स्टार' आजपासून (२६ एप्रिल) OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाला आहे. सिनेमाचे ओटीटी हक्क ॲमेझॉन प्राइम व्हिडीओने विकत घेतले आहेत.  चित्रपटगृहात बघायची संधी हुकलेल्या प्रेक्षकांसाठी आता हा सिनेमा ओटीटीवर दाखल झाला आहे.  'द फॅमिली स्टार'ने बॉक्स ऑफिसवर खराब कामगिरी केली आहे. 50 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट निम्माही खर्च वसूल करू शकला नाही. 

'फॅमिली स्टार' सिनेमाची खासियत अशी की, विजयसोबत त्याची आजी म्हणून मराठमोळी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी दिसतात. परशुराम यांनी सिनेमाच्या लेखन - दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. 2018 च्या ब्लॉकबस्टर 'गीता गोविंदम' नंतर विजय देवरकोंडा आणि दिग्दर्शक परशुराम पेटला 'द फॅमिली स्टार'मध्ये दुसऱ्यांदा एकत्र काम केलं आहे.

'द फॅमिली स्टार' सिनेमात विजय हा एक कुटुंबवत्सल माणूस दिसतोय. जो आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी काहीही करू शकतो. त्याच्या आयुष्यात मृणाल येते. मृणाल ही एक भाडेकरु असते. अचानक ट्विस्ट अँड टर्न येतात आणि विजय गुंडांना लोळवताना दिसतो. या चित्रपटात रोमान्स, ड्रामा, ॲक्शन आणि कॉमेडीचाही भरपूर डोस आहे.  या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने U/A प्रमाणपत्र दिले आहे आणि त्याची रन टाइम दोन तास त्रेचाळीस मिनिटे आहे.

 

टॅग्स :विजय देवरकोंडासेलिब्रिटीबॉलिवूडTollywoodसिनेमामृणाल ठाकूर