Join us

'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 17:59 IST

साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना ही बातमी दिली.

'ये है मोहोब्ते' या गाजलेल्या मालिकेतील अभिनेता अभिषेक वर्माने (Abhishek Verma) गुडन्यूज दिली आहे. लवकरच तो गर्लफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. होणाऱ्या बायकोसोबत साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना ही बातमी दिली. इन्स्टाग्रामवर त्याने फोटो शेअर केले असून त्यावर अनेकांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

अभिषेक वर्माच्या होणाऱ्या बायकोचे नाव इदित्री गोयल आहे. दोघांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत. निळ्या रंगाच्या मखमली लेहेंग्यात इदित्री खूपच सुंदर दिसत आहे. तर अभिषेकनेही रॉयल आऊटफिट परिधान केला आहे. अभिषेकने या फोटोंसोबत खूपच गोड कॅप्शन लिहिले आहे. तो लिहितो, "याला किती अॅटिट्यूड आहे असं ऐकण्यापासून ते हा किती गोड आहे हे ऐकायला मिळणं इथपर्यंतचा प्रवास एखाद्या सिनेमाच्या कहाणीपेक्षा कमी नाही. आपण एकमेकांसोबत घालवलेले दिवस खूप सुंदर होते आणि आता तुझ्यासोबत आयुष्याचा नवीन चॅप्टर सुरु करण्यासाठी मी आतुर आहे. मी नेहमीच जिला त्रास देऊ शकेन अशा व्यक्तीशी माझी भेट घडवून आणल्याबद्दल देवाचे खूप आभार. माझी मैत्रीण, माझी बायको आणि माझं आयुष्य. आय लव्ह यू."

अभिषेकच्या या पोस्टवर मालिकेतील सहकलाकार अभिनेत्री अनिता हसनंदानीनेही कमेंट केली आहे. 'what! अभिनंदन' असं तिने लिहिलं आहे. तसंच इतरही कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिषेकने 'ये है मोहोब्बते' शिवाय 'नागिन','बडी दूर से आये है','पवित्र भाग्य' या मालिकांमध्येही काम केले आहे.

टॅग्स :ये है मोहब्बतेंटिव्ही कलाकारलग्नरिलेशनशिपसोशल मीडिया