Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्या बात! 'तू ही रे माझा मितवा' फेम अभिनेत्रीची थेट बॉलिवूड चित्रपटात वर्णी, आमिर खानच्या प्रोजेक्टमध्ये दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:41 IST

'तू ही रे माझा मितवा' फेम अभिनेत्रीला लागली लॉटरी, 'या' हिंदी चित्रपटात झळकणार

Tu Hi Re Maza Mitwa : 'तू ही रे माझा मितवा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असणारी मालिका आहे. या मालिकेतील नायकाची आणि नायिकेची प्रेमकथा काहीशी अनोखी आहे.अभिनेता अभिजीत आमकर आणि शर्वरी जोग यांची या मालिकेत  मुख्य भूमिका आहे. एकमेकांशिवाय जगता येत नाही आणि एकमेकांबरोबर राहताही येत नाही अशी काहीशी अवस्था त्यांची पाहायला मिळते. ‘तू ही रे माझा मितवा’ मध्ये अभिजीत आणि शर्वरीसह अभिनेत्री रुपल नंद, सुरभी भावे, मधुरा जोशी,मानसी मागीकर या कलाकारांच्याही भूमिका आहेत. 

दरम्यान, मालिकेत अभिनेत्री मधुरा जोशी ईश्वरीच्या बहिणीची म्हणजे नम्रता देसाई ही भूमिका साकारते आहे.मधुराने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा असलेली ही नायिका आता थेट हिंदी चित्रपटात झळकणार आहे. नुकतीच सोशल मीडियावर मधुरा जोशीने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत तिच्या नव्या प्रोजेक्टची माहिती शेअर केली आहे.

'हैप्पी पटेल खतरनाक जासूस' असं या चित्रपटाचं नाव आहे. येत्या १६ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वीर दास यांनी केले आहे. तसेच या चित्रपटात वीर दास, मोना सिंग, मिथिला पालकर हे कलाकार  मुख्य भूमिकेतही आहेत.या चित्रपटाची निर्मिती आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली झाली आहे. हा एक कॉमेडी-सस्पेंस चित्रपट आहे.यात आमिर खान आणि इम्रान खान यांच्याही विशेष भूमिका आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Tu Hi Re Maza Mitwa' actress debuts in Aamir Khan's film.

Web Summary : Madhura Joshi, known from 'Tu Hi Re Maza Mitwa,' joins Bollywood in 'Happy Patel Khatarnak Jasoos,' produced by Aamir Khan Productions. The comedy-suspense film, directed by Veer Das, features prominent actors and releases January 16th.
टॅग्स :आमिर खानमोना सिंगसिनेमाटिव्ही कलाकारबॉलिवूड