Join us

मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 18:07 IST

सूरजच्या नव्या प्रवासाला सुरुवात कधी आणि कुठे होणार, याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते अत्यंत उत्सुक आहेत.

Suraj Chavan Wedding Date Location: 'बिग बॉस मराठी ५' या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोमधून केवळ प्रेक्षकांची मनं जिंकून शोचा विजेता ठरलेला रीलस्टार सूरज चव्हाण (Suraj Chavan) सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून 'सूरज चव्हाण कधी लग्न करणार?' याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागून राहिली होती. अखेर त्याची लगीनघाई सुरू झाली असून लवकरच तो बोहल्यावर चढणार आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर सूरजच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा आणि नाव समोर आले होते. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.आता अखेर सूरज चव्हाणच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण याबद्दलची अधिकृत माहिती समोर आली आहे. सूरजच्या नव्या प्रवासाला सुरुवात कधी आणि कुठे होणार, याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते अत्यंत उत्सुक आहेत.

सूरज चव्हाण लवकरच संजना हिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नाला आता काहीच दिवस उरले आहेत. सूरज चव्हाणचा लग्नसोहळा हा २९ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्यांचा हा पारंपरिक विवाह सोहळा पुण्याजवळील जेजूरी, सासवड येथे होणार असल्याची माहिती समोर येत आहे. लग्नाच्या मुख्य समारंभापूर्वीचे विधी २८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या समारंभात हळद, मेहंदी आणि संगीत यांसारखे पारंपरिक समारंभ पार पडतील. या सोहळ्यासाठी सूरजचे नवीन घर खास सजावट करून तयार होणार आहे.

मामाची पोरगी पटवली!सूरजच्या लग्नाबद्दल 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर हिने लोकमत सखीशी बोलताना एक खुलासा केला आहे. अंकिताने सांगितले की, संजना ही सूरजच्या चुलत मामाची मुलगी आहे. विशेष म्हणजे, त्यांचे हे लग्न अरेंज मॅरेज नसून लव्ह मॅरेज आहे. सूरज आणि संजना एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. नुकतेच अंकिता वालावलकर हिने सूरज आणि संजना यांचे खास 'केळवण' केले होते आणि त्यांना भेटवस्तूही दिल्या होत्या. आता सूरज आणि संजना यांना पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात अडकताना पाहण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Bigg Boss Marathi winner Suraj Chavan to marry his cousin!

Web Summary : Suraj Chavan, winner of Bigg Boss Marathi 5, will marry Sanjana, his cousin, on November 29th in Jejuri. The pre-wedding festivities begin November 28th. It's a love marriage, not arranged, revealed Ankita Walawalkar.
टॅग्स :बिग बॉस मराठीबिग बॉस १९टिव्ही कलाकारअंकिता प्रभू वालावलकर