Join us
Daily Top 2Weekly Top 5

सविता प्रभुणेंचं मराठी मालिकाविश्वात पदार्पण; लवकरच झळकणार 'या' मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 16:37 IST

Savita prabhune: ही मालिका येत्या १८ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मराठी कलाविश्वातील ९० चा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सविता प्रभू. उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर सविता प्रभू यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. इतकंच नाही तर मराठीसह त्यांनी हिंदी मालिकाविश्वामध्येही त्यांचं भक्कम स्थान निर्माण केलं. पवित्र रिश्ता या गाजलेल्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारुन त्यांनी विशेष लोकप्रियता मिळवली. विशेष म्हणजे हिंदी मालिकाविश्व गाजवल्यानंतर  पुन्हा एकदा त्यांची पावलं मराठी कलाविश्वाकडे वळली आहेत. लवकरच त्या एका नव्या कोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

मराठी कलाविश्वात सध्या अनेक नवनवीन मालिकांची निर्मिती होताना दिसत आहेत. यामध्येच सध्या छोट्या पडद्यावर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची चर्चा रंगली आहे. रेश्मा शिंदे हिची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेत सविता प्रभू महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेत त्या सासूबाईंची भूमिका साकारणार आहेत. कायम प्रेमळ आईची भूमिका साकारणाऱ्या सविता प्रभू यांना सासूच्या रुपात पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे आतुर झाले आहेत.

दरम्यान, येत्या १८ मार्चपासून घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  सविता प्रभू यांनी 'मला सासू हवी', 'जावई विकत घेणे आहे' या मराठी मालिकांसोबत 'कुसुम', 'सारथी', 'पलछीन', 'साया', 'पवित्र रिश्ता', 'तुझसे है राबता' या हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच अनेक गाजलेले सिनेमा आणि नाटकांमध्येही काम केलं आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसविता प्रभूणेसेलिब्रिटीटिव्ही कलाकाररेश्मा शिंदे