समीर चौघुले हे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील प्रसिद्ध अभिनेते. समीर चौघुलेंना आपण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये विविध पात्र साकारताना पाहिलंय. समीर चौघुले सध्या वैयक्तिक आयुष्यात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'सोबतच 'सम्या सम्या मैफिलीत माझ्या' कार्यक्रमही करत आहेत. याचनिमित्त समीर चौघुले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. समीर यांनी सोशल मीडियावर या भेटीचा अनुभव शेअर केला आहे. समीर चौघुले लिहितात, ''सम्या सम्या मैफिलीत माझ्या” या माझ्या एकपात्री कार्यक्रमाचे १०० प्रयोग झाल्याबद्दल अभिनंदनाचे अनेक फोन आले ..पण एक कॉल खूपच अनपेक्षित आणि खास होता…तो होता अत्यंत दिलखुलास, दर्दी, कलासक्त नेते..माननीय राजसाहेब ठाकरे यांचा - “दादरलाच आहात मग घरी येऊन जा” ….आणि मग झाली एका राजामाणसाबरोबर एक सहजसुंदर भेट, भरपूर गप्पा आणि हास्यजत्रेवरील प्रेम.. आणि हो मी निघताना १०० प्रयोग झाल्याबद्दल मला आणि माझ्या सहचारिणीला दिलेली सुंदर भेटवस्तू ..मनापासून आभार साहेब….''
Web Summary : Samir Choughule, celebrated from 'Maharashtrachi Hasyajatra,' met Raj Thackeray after his show's 100th performance. Thackeray congratulated him, invited him home, gifted him and his wife, and showed affection for 'Hasyajatra.'
Web Summary : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' के मशहूर समीर चौघुले ने अपने शो के 100वें प्रदर्शन के बाद राज ठाकरे से मुलाकात की। ठाकरे ने उन्हें बधाई दी, घर बुलाया, उन्हें और उनकी पत्नी को उपहार दिया, और 'हास्यजत्रा' के लिए स्नेह दिखाया।