Join us

अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 09:28 IST

Suraj Chavan Wife Sanjana: सूरज चव्हाणने होणाऱ्या बायकोसाठी खास उखाणा घेऊन तिचा चेहरा सर्वांना दाखवला आहे. सूरजच्या साध्याभोळ्या बायकोने सर्वांचं मन जिंकलंय

सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी ५ चा विजेता. रिल स्टार म्हणून नावारुपाला आलेला सूरज गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सूरज लवकरच लग्न करणार असल्याने चाहत्यांना त्याच्या लग्नाबद्दल उत्सुकता आहे. सूरजने काहीच दिवसांपूर्वी ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. परंतु त्याने त्याच्या होणाऱ्या बायकोबद्दल खुलासा केला नव्हता. अखेर सूरजने होणाऱ्या बायकोचा चेहरा दाखवला असून अंकिता वालावलकरच्या घरी सूरजचं केळवण झालं आहे.

सूरजच्या होणाऱ्या बायकोचं नाव काय?

कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकरच्या घरी सूरज चव्हाणचं केळवण झालं. यावेळी सूरजसोबत त्याची बायकोही दिसली. सूरजच्या होणाऱ्या बायकोचं नाव संजना आहे. दोघांनी एकमेकांसाठी खास उखाणा घेतला. सूरजने उखाणा घेतला की, ''बिग बॉस जिंकून झालं माझं स्वप्न पूर्ण, बोललो होतो ना आधी करिअर मग लग्न.''

पुढे संजना सूरजसाठी उखाणा घेते की, ''बिग बॉसचा विनर झाला माझ्या प्रेमात सायको, सूरजरावांचं नाव घेते मीच त्यांची होणारी बायको.'' यानंतर अंकिताने त्यांच्यासाठी केळवणाचा थाट घातला होता. अंकिताने दोघांना ओवाळलं. खास भेटवस्तू दिली. सूरज आणि संजना दोघांनीही एकमेकांना गोड पदार्थ भरवला. अशाप्रकारे सूरज आणि संजनाच्या जोडीला पाहताच चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. सूरजच्या होणाऱ्या बायकोच्या साधेपणाने सर्वांचं मन जिंकलंय. 

अंकिता वालावलकर कायमच सूरज चव्हाणच्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे या आनंदाच्या प्रसंगी अंकिता उत्साहात दिसली. तिने सूरजसोबत गप्पा मारल्या. याशिवाय अभिनेत्री योगिता चव्हाणला व्हिडीओ कॉल केला. सूरज आणि संजना लग्न कधी करणार याची सर्वांना उत्सुकता आहे. परंतु याच वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत हे दोघे लग्न करणार असल्याची शक्यता आहे. सूरज चव्हाणच्या लग्नाला कोण उपस्थित राहणार? हे पाहणं औत्सुक्याचं आहे. सूरज चव्हाणने मधल्या काळात 'झापुकझुपुक' सिनेमातून प्रेक्षकांचं मन जिंकलं

English
हिंदी सारांश
Web Title : Suraj Chavan Reveals His Wife-to-be's Face at Kelvan Ceremony!

Web Summary : Bigg Boss Marathi 5 winner Suraj Chavan revealed his fiancee, Sanjana. A Kelvan ceremony was held at Ankita Walawalkar's home. The couple exchanged loving words and enjoyed the pre-wedding celebration. Fans showered the couple with love.
टॅग्स :अंकिता प्रभू वालावलकरबिग बॉस मराठीटेलिव्हिजनमराठी अभिनेतामराठी चित्रपट