Join us

नवऱ्यासह माहेरी पोहोचली प्रार्थना, कोकणातील समुद्र प्रवासातील सुरेख व्हिडीओ केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 16:00 IST

Prarthana behere: प्रार्थनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती सिंपल लूकमध्ये दिसत असून तिच्या साधेपणाचं नेटकरी कौतुक करत आहेत.

प्रार्थना बेहेरे (prarthana behere) हे नाव मराठीसह हिंदी कलाविश्वाला नवीन नाही. पवित्र रिश्ता, माझी तुझी रेशीमगाठ या हिंदी-मराठी मालिकांच्या माध्यमातून तिने तुफान लोकप्रियता मिळवली. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. यात प्रार्थना सुद्धा तिच्याविषयीचे लहानमोठे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रार्थनाने नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत तिचा नवरा अभिषेक जावकर सुद्धा दिसून येत आहे. प्रार्थना सध्या कोकण दौऱ्यावर असून ती अभिषेकला तिच्या गावी घेऊन गेली आहे. याविषयी प्रार्थनाने हॅशटॅग वापरत चाहत्यांना कल्पना दिली आहे.

बोटीने समुद्र प्रवास करतांनाचा व्हिडीओ प्रार्थनाने शेअर केला असून हिच्या घोवाला कोकण दाखवा..!!!!असं कॅप्शन दिलं आहे. सोबतच तिने व्हिडीओसोबत कोकणची चेडवा हो नाखवा..हे गाणं प्ले केलं आहे. इतकंच नाही तर तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती सिंपल लूकमध्ये दिसत असून तिच्या साधेपणाचं नेटकरी कौतुक करत आहेत.   

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारकोकणबॉलिवूड