राजस्थानी चित्रपटसृष्टी आणि फॅशन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल हर्षिल कालिया (Harshil Kalia) हिचा जयपूरमध्ये एका भीषण कार अपघातातमृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री उशिरा कामावरून घरी परतत असताना हा अपघात झाला. या घटनेमुळे जयपूरच्या कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय हर्षिल सोमवारी रात्री ११:३० च्या सुमारास स्वतःची कार चालवत जयपूरमधील शिप्रा पथ रोडवरून घरी जात होती. यादरम्यान तिचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला जोरात धडकली. वेग जास्त असल्याने कार पलटी होऊन रस्त्याच्या मधोमध पडली. या अपघातात हर्षिलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि कारमधून हर्षिलला बाहेर काढले. तिला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
हर्षिल कालियाने डिझ्नी प्लस हॉटस्टारवरील 'क्राइम नेक्स्ट डोअर' या वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने अनेक राजस्थानी म्युझिक व्हिडिओतही काम केलंय. काही काळ तिने न्यूज अँकर म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. ती 'मिस दिवा राजस्थान २०२१' ची फर्स्ट रनर-अप देखील होती. हर्षिलचे वडील पत्रकारितेच्या क्षेत्राशी संबंधित असून एका खाजगी वृत्तपत्रात कार्यरत आहेत. हर्षिलसारख्या लोकप्रिय अभिनेत्रीच्या अकाली निधनाने तिच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Web Summary : Actress and model Harshil Kalia, 30, tragically died in a Jaipur car accident. She lost control of her car and crashed into a divider. Kalia was known for her roles in web series and music videos.
Web Summary : अभिनेत्री और मॉडल हर्षिल कालिया, 30 वर्ष की, का जयपुर में एक कार दुर्घटना में दुखद निधन हो गया। उन्होंने कार पर से नियंत्रण खो दिया और डिवाइडर से टकरा गईं। कालिया वेब सीरीज और म्यूजिक वीडियो में अपने अभिनय के लिए जानी जाती थीं।