Join us
Daily Top 2Weekly Top 5

'दार उघड बये' फेम 'या' अभिनेत्रीची 'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये एन्ट्री; साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 14:28 IST

Marathi actress: 'दार उघड बये' या मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली होती.

सध्या छोट्या पडद्यावर अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये अलिकडेच घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सुरु झाली आहे. रेश्मा शिंदेची मुख्य भूमिका असलेली ही मालिका पहिल्या दिवसापासून लोकप्रिय ठरत आहे. उत्तम कथानकासह यातील कलाकारही प्रेक्षकांची मन जिंकण्यास यशस्वी ठरली आहेत. यामध्येच आता या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. 

'दार उघड बये' या मालिकेतील एक लोकप्रिय अभिनेत्री घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या नव्या मालिकेची माहिती दिली आहे. 'दार उघड बये' या मालिकेतील रेणुका अर्थात अभिनेत्री भाग्यश्री दळवी हिची आता घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत एन्ट्री झाली आहे.

'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत भागयश्री आता निकिता ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. भाग्यश्रीने मेकअप रूममधील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोबतच "निकिता म्हणून माझा नवीन प्रवास सुरु होतोय. नवीन मालिका, नवीन टीम, नवीन काम..गणपती बाप्पा मोरया..बघायला विसरू नका ‘घरोघरी मातीच्या चुली", असं म्हणत भाग्यश्रीने तिच्या नव्या मालिकेची माहिती दिली आहे.

दरम्यान, या मालिकेपूर्वी भाग्यश्रीने ‘खरंच तिचं काय चुकलं?’, ‘दार उघड बये’, ‘सांग तू आहेस का?’, ‘भाग्य दिले तू मला’, अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. घरोघरी मातीच्या चुली या तिच्या नव्या मालिकेत तिच्यासोबत रेश्मा शिंदे, सुमीत पुसावळे, सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, आरोही सांबरे हे कलाकार मंडळी स्क्रीन शेअर करत आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटीरेश्मा शिंदेसविता प्रभूणे