Join us
Daily Top 2Weekly Top 5

"बिग बॉसमध्ये तुम्ही पण पाहिजे होतात..." चाहत्याच्या कमेंटवर विशाखा सुभेदारचा रिप्लाय, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 16:23 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशाखा सुभेदार नावारूपाला आली.

Vishakha Subhedar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशाखा सुभेदार नावारूपाला आली. दमदार अभिनय आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर तिने मराठी मनोरंजन विश्वात स्वत: ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. आपल्या विनोदी शैलीच्या जोरावर तिने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. कॉमेडीचं अचूक टायमिंग साधत विशाखा सुभेदारने हास्य रसिकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. 

सध्या  विशाखा सुभेदार स्टार प्रवाहवरील 'शुभविवाह' या मालिकेत काम करताना दिसते आहे. विशाखा सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असल्याची पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती वेगवेगळे व्हिडीओ तसेच फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. अगदी कालच जागतिक मैत्री दिनाच्यानिमित्ताने विशाखाने तिचा जिवलग मित्र पॅडी कांबळेला पाठिंबा देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेते पॅडी कांबळे सध्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ तिने ही पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. 

विशाखाने मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्रामवर तिचा आणि पॅडी कांबळेचा एक फोटो पोस्ट केला आहे. ही पोस्ट शेअर करताच तिच्या चाहत्यांनी प्रश्नांचा भडीमार केला आहे. विशाखाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी "तुम्ही पण बिग बॉसमध्ये असायला पाहिजे होतात". अशी  कमेंट केली आहे. त्यावर उत्तर देत विशाखा सुभेदारने "पुढच्या वेळी" असा रिप्लाय केला आहे. त्यामुळे बिग बॉस च्या सहाव्या पर्वामध्ये लाफ्टर क्वीन विशाखा दिसणार की हे नाही? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

विशाखा  सुभेदारने वेगवेगळ्या मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. 'फू बाई फू', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन'  यांसारख्या कॉमेडी शोमध्ये ती झळकली आहे. तसेच 'ये रे ये रे पैसा', 'येड्यांची जत्रा' या चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारबिग बॉस मराठीसोशल मीडिया