Join us

'ए आपलं गाणं लाव रे'! पहाडी साँगवर भारी पडला वनिताचा मराठमोळा स्वॅग; 'गुलाबी शरारा' करायला लावलं बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 14:17 IST

Vanita kharat: वनिताचा भन्नाट डान्स व्हिडीओ एकदा पाहाच

गेल्या काही काळामध्ये पडाही साँगची नेटकऱ्यांनी चांगलीच भुरळ पडली आहे. त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी पडाही साँगवर हटके रिल्स शेअर केले आहेत. यात खासकरुन गुलाबी शरारा या गाण्याने तर नेटकऱ्यांना चांगलं वेड लावलं आहे. परंतु, हे ट्रेंड होत असताना आपल्या मराठमोळ्या वनिता खरातने हे गाणं सोडून थेट तिचा मराठी बाणा जपला आहे. सध्या सोशल मीडियावर वनिताचा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात (vanita kharat), चेतना भट्ट (chetana bhat) आणि मधुरा जोशी (madhura joshi) यांचा एक जबरदस्त डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चेतना आणि मधुरा गुलाबी शरारा या गाण्यावर रील करत असतात. मात्र, त्यांचा हा डान्स काही वनिताला पटला नाही त्यामुळे तिने त्यांना बाजूला करत आपलं मराठमोळं गाणं लावत या अभिनेत्रींना त्यावर ठेका धरायला लावला.

मधुरा आणि चेतना नाचत असताना वनिता त्यांना बाजूला करते आणि, “लगेच आल्या ठुमक ठुमक. हो बाजूला. ए भावा आपलं लावं”, असं म्हणते. त्याच्यानंतर ‘ठुमक ठुमक लचक लचक तिरकी तुझी चाल, छन छनननन पैजण हे बोलं’ हे मराठी गाणं लागतं. या गाण्यावर वनिता, चेतना आणि मधुराला ताल धरायला लावते.

दरम्यान, या तिघींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत असून तो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. वनिता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. वनिताचं युट्यूब चॅनेल सुद्धा असून यातून ती तिच्याविषयीचे अपडेट चाहत्यांना देत असते.

टॅग्स :वनिता खरातमहाराष्ट्राची हास्य जत्राटेलिव्हिजनटिव्ही कलाकार