'खिचडी' आणि 'साराभाई व्हर्सेस साराभाई' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते जेडी मजेठिया (JD Majethia) सध्या त्यांच्या फोटोंमुळे चर्चेत आले आहेत. वयाच्या ५७ व्या वर्षी जेडी मजेठिया यांनी पुन्हा लग्न केले असून त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत, अशी चर्चा रंगली होती. मात्र, या फोटोंमागचे सत्य आता समोर आले आहे.
अभिनेता पुन्हा चढला बोहल्यावरसोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये जेडी मजेठिया यांच्यासोबत त्यांची पत्नी निपा मजेठिया दिसत आहेत. हे दोघेही नवरा-नवरीच्या रूपात नटलेले पाहायला मिळत आहेत. जेडी मजेठिया आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या लग्नाचा ३० वा वाढदिवस 'पुनर्विवाह' करून साजरा केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाची सर्व तयारी त्यांच्या मुलीने केली होती.
Web Summary : Actor JD Majethia, known for 'Khichdi,' remarried his wife, Nipa, on their 30th anniversary. They had a quick court marriage initially, and this ceremony fulfilled Nipa's wish for a traditional wedding. Their daughter planned the event.
Web Summary : 'खिचड़ी' के लिए जाने जाने वाले अभिनेता जेडी मजेठिया ने अपनी 30वीं सालगिरह पर अपनी पत्नी निपा से दोबारा शादी की। उन्होंने शुरू में जल्दबाजी में कोर्ट मैरिज की थी, और इस समारोह ने निपा की पारंपरिक शादी की इच्छा पूरी की। उनकी बेटी ने इस कार्यक्रम की योजना बनाई।