Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॉर्निया डॅमेज झाल्यावर जॅस्मीन भसीनची दृष्टी बनला बॉयफ्रेंड अली गोनी, अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 13:27 IST

अली गोनीचं कौतुक करणारी पोस्ट तिने शेअर केली आहे.

बिग बॉस फेम अभिनेत्री जॅस्मीन भसीन (Jasmin Bhasin) सध्या चर्चेत आहे. डोळ्यात लेन्स घातल्याने कॉर्निया डॅमेज झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दिसत नसतानाही ती इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती.  यानंतर जॅस्मीनच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली. आता जॅस्मीन यातून हळूहळू रिकव्हर होत आहे. यामध्ये बॉयफ्रेंड अली गोनीने तिची साथ दिली. अली गोनीचं कौतुक करणारी पोस्ट तिने शेअर केली आहे.

जॅस्मीन भसीनने अली गोनीसोबतचे काही व्हिडिओ शेअर करत लिहिले, "गेले काही दिवस माझ्यासाठी अत्यंत कठीण, वेदना देणारे आणि दृष्टीहीन होते. थँक्यू सो मच अली, तू 24*7 फक्त माझ्यासोबत नव्हतास तर माझे डोळे बनून राहिलास. मला हसवण्याचा प्रयत्न करत होतास आणि वेदना विसरण्यासाठी, प्रत्येक मिनिटाला माझ्यासाठी प्रार्थना करत होतास."

दोन दिवसांपूर्वी जॅस्मीनने तिच्या या परिस्थितीविषयी सांगितले की,"मी खूप वेदनेत आहे. मी चार-पाच दिवसात ठीक होईल असं डॉक्टर म्हणाले. पण तोपर्यंत मला डोळ्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पण हे सोपं नाहीए कारण मी नीट पाहूही शकत नाही आणि वेदनेमुळे मला झोपही लागत नाहीए." 

दरम्यान जॅस्मीनने लवकरच कामावर परतण्याची आशा व्यक्त केली आहे. सुदैवाने तिला कोणतंही काम टाळावं लागलेलं नाही असंही ती म्हणाली.

टॅग्स :जास्मीन भसीनटिव्ही कलाकारटेलिव्हिजनसोशल मीडिया